Thursday, November 17, 2011

Condom !!


Readers are requested to read this post on their onus only. As a author this post doesn’t contain any adult material. Still if readers feels so.... then Close window “X” option is available for all.That day I was listening songs on mobile FM Radio. After song was cover, one advertisement(ad) started, so as usual I changed radio station. On another channel also one ad was going. I moved to third station. There also one advt was going on. On second station, advt of one Condom company was just ending and I heard last word of ad “……..Condom”. On third station one cement companies ad was ending. Their last sentence was, “………….Sadiyon ke liye” If  both the words are heard within seconds it heard as “…..Condom, sadiyon ke liye”

Oh ! that’s amazing, I got some fishy idea. Almost all things which we are using in our day today life are advertised on Radio and TVs and almost all the products are sold with products’ famous tag line which covers from toothbrush, salt, clothes, cars etc almost everything. For ex. Raymond carry tag line of ‘Raymond, The Complete Man’ or Nokia with ‘Connecting People’

Now suppose all these companies started to produce Condoms by keeping their same tag line….then just imagine…….I am giving some examples of such marketing line. I am not telling anything…you just read, think and enjoy.

Read More

Friday, July 8, 2011

Blogger new look

Good  !!!
Bloogger have changed their design...It's good to see...very light design.....little bit difficult to handle because of new design....but good!!! change is required in life

Read More

Tuesday, June 28, 2011

नकळत एकदा...


आजपण नेहमीप्रमाणे आईने त्याला औषधाच्या गोळ्या काढून दिल्या. आईला नको म्हणून समजावून सांगून सुद्धा तिने गोळ्या आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. तिला सांगून तरी काय फायदा कि आता ह्या गोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यांनी जे काम करायचे ते त्यांचे करून झाले आहे. आता ह्यांचा काही उपयोग नाही पण जाऊदेत तिला तरी कशाला दुखवायचे. म्हणून त्याने गपचूप गोळ्या खावून घेतल्या.आईने  त्याच्या बारीक कापलेल्या केसावरून प्रेमाने हात फिरवला. गोळ्या खाल्ल्यावर ती निघून गेली.


Read More

Friday, May 6, 2011

नव्या नावाने ....

नावात काय आहे ? असे खूप जण म्हणत असले तरी माझ्या अनुभवानुसार नावातच सर्व काही आहे. एक नाव पुरेसे असते खूप काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी. त्यामुळे ब्लॉग ला एक चांगले नाव असावे हि खूप दिवसापासून इच्छा होती. आशिष सावंत हे नाव किती दिवस लोकांच्या लक्षात राहील? स्वत:च्या नावावर ब्लॉग लिहायला असेहि आवडतच नव्हते. काहीतरी एक युनिक नाव शोधणे चालू होते.


माझा आताचा ब्लॉग चालू करून दोन/ सव्वा दोन वर्षे झाली. जानेवारी २००९ मध्ये ब्लॉग लिहायला सुरुवात झाली पण दीड वर्षात फक्त ३/४च ब्लॉग लिहून झाले. ह्या दीड वर्षात आयुष्यात खूप स्थित्यंतरे झाले. आयुष्याचे मोठ मोठे आणि काही कडवे निर्णय पण घ्यावे लागले. खूप काही मोठे व्यवहार एकट्यालाच करावे लागले. ह्याच काळात दोन मोठे अपघातहि झाले. सुदैवाने दोन्ही अपघातातून वाचलो. त्याच्या जखमा आणि दुखणे अजून ही अंगावर आहे. आतापर्यंतचा आयुष्यातला सर्वात कठीण आणि खडतर काळ होता. त्या झटक्यातून सावरायला कमीत कमी पुढची ८/९ महिने तरी जावी लागली. ह्या काळात हातून काहीच निर्मिती झाली नाही. अगदी महिनोन महिने इंटरनेटला हात पण लावता आला नाही. जमेची बाजू एकची की नशिबाने आणि परिस्थितीने एवढे अनुभव दिले कि मॅच्युरिटी लेवल जवळपास दहा वर्षांनी वाढली.


जरा गाडी रुळावर आल्यावर सर्वात आधी लॅपटॉप घेतला अगदी टीवी घेण्याआधी सुद्धा. इंटरनेट घेतले आणि परत ब्लॉगिंग ला सुरुवात झाली. जुन्या ब्लॉगवरुनच गाडी पुढे चालायला लागली. पण स्वत:च्या नावाने ब्लॉग बनवण्यापेक्षा काहीतरी युनिक असे नाव शोधत होतो. पण मनासाखे मिळतच नव्हते. एक छोटे, उच्चारायला सोपे, टाइप करायला सहज असणारे नाव शोधत होतो. काही नावे आवडली पण काही महाभागांनी आधिच अडकवुन ठेवली होती. ब्लॉग तर काही लिहिले नव्हते फक्त नावे बुक्ड करुन ठेवली होती. अगदी “बुक्ड” (booked) नाव सुद्धा. बघा चेक करुन. जवळपास ३ महिन्यात पत्नि, बहिण आणि मित्रांनी हजारो नावे तरी सुचवली असतील पण काहीच पसंत पडत नव्हते. काही दिवसापूर्वी एका शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मराठी डिक्शनरी उघडली होती. तेव्हा सुचले कि डिक्शनरीच काढून बघूया काही नावे भेटताहेत का ? साडेचारशे पानाची डिक्शनरी, त्यात शोधून शोधून कसे शोधणार? शेवटी एक चान्स घ्यायचा म्हणून कुठल्यातरी एका पानावर हात ठेवायचा आणि त्यात काही नाव दिसते का बघायचे असे ठरवले आणि लहान मुले करतात तसे राम लक्ष्मण सीता करत एका पानावर हात ठेवला. पान निघाले "भ" ह्या अक्षराचे.

म्ह्टले झाले कल्याण !!! आता काही मिळत नाही. पण नजर एका शब्दावर जाऊन थांबली आणि मन एकदम फिल्मी स्टाईलमध्ये वीस वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेले. लहानपणी हि वस्तू घेऊन खूप खेळलो होतो. एप्रिल मेच्या सुट्टीत तर खिशात घेऊनच फिरायचो. जमिनीवर असो, हातावर असो, पोटावर असो कुठेही फिरवता यायची हि वस्तू. लोखंडी कानस वर धार करून तिचे टोक अजून टोकेरी करायचो जेणेकरून तो जास्त वेळ फिरेल आणि खेळताना सुद्धा दुसर्‍याच्या वस्तू वर नेम धरून मारता पण येईल. त्यावेळेला लाकडामध्ये सुंदर रंगकाम केलेलं मिळायचे आणि काही ठिकाणी प्लास्टिकचे पण मिळायला सुरुवात झाली होती. पण लाकडाचे सौंदर्य कायम राहिले. त्यासाठी लागणार्‍या रश्शीला एखादा थमसअप किंवा पेप्सीचा बिल्ला लावायचा आणि अख्ख्या चाळी मध्ये फिरवत राहायचो. ह्या वस्तूने कमीत कमी खर्चात आतापर्यंत फक्त आनंदच दिला आहे ते सुद्धा बदल्यात काही न मागता. मी कुठल्या वस्तूबद्दल म्हणतोय ह्याचा अंदाज आला असेल एव्हाना. नुसत्या 'त्या' शब्दावर माझ्या एवढ्या वीस वर्षापूर्वीच्या आठवणी चाळवल्या गेल्या अगदी ढवळल्या गेल्या.....विचार केला कि ह्या पेक्षा चांगले नाव भेटनारच नाही....." भोवरा ".
भोवरा ह्या शब्दाबरोबर कितीतरी जणांच्या गोड आठवणी असतील ना ?
सुदैवाने ब्लॉग कोणी रजिस्टर पण केला नव्हता. पहिले बायक़ोला फोन केला, तिला विचार सांगितले ...तिने हुश्श्य केले....म्हणाली, एकदाचे तुझ्या पसंतीचे नाव भेटले तुला. आणि ते सुद्धा आम्ही सुचवण्यापेक्षा तुलाच सुचले आहे ते नशीब. मित्रांना पाठवले त्यांनीही सहमती दर्शवली. जिगर ला सांगितले, माझ्या स्वभावाला आणि भोवर्‍याला साधर्म्य होईल अशी एक चारोळी लिहून दे गुजराती असून हि त्याने पाच मिनिटात मराठीत दोन तीन चारोळ्या लिहून पाठवल्या. त्यात व्याकरणाचे बदल करत हि चारोळी फायनल केली. (जिगर ला धन्यवाद देवून शिवी देणार नाही.)

आपल्याच धुंदीत फिरतोय मी,
मदमस्त होऊन जगतोय मी,
बेधुंद वाऱ्यातही स्थिर आहे मी,
दुनिया म्हणते की भोवरा आहे मी.

मग काय ! त्या रात्री लगेच ब्लॉग रजिस्टर केला. जुना ब्लॉग सर्व पोस्ट सहित एक्सपोर्ट केला आणि नवीन ब्लॉग मध्ये इम्पोर्ट केला. १८ ते २० मिनिटे लागली. पण सर्व सुरळीत पार पडले अगदी काही एरर(error) न येता. काही विजेट आणि स्क्रिप्ट कॉपी पेस्ट झाल्या नाही त्या मॅन्युअली कराव्या लागल्या. बाकी सगळे झाले. पण तरी सुद्धा ब्लॉग पब्लिश करायला दोन आठवडे वाट बघावी लागली कारण हेडर मध्ये लावायला भोवर्‍याचा चांगला फोटो मिळत नव्हता.

जे उपलब्ध होते ते कॉपीराईट होते. विचार केला स्वत:च भोवर्‍याचा फोटो काढून ब्लॉग वर टाकावा. घरात जुने भोवरे होते पण शोधून काहि मिळत नव्हते. कितीतरी दुकाने पालथी घातली पण लाकडी भोवरे मिळणेच बंद झाले. सर्वांकडे प्लास्टिक मधले होते. ते सुद्धा खास नव्हते. एक मे ला, महाराष्ट्र दिनी ब्लॉग पब्लिश करायचा विचार होता पण जमलेच नाही. शेवटी काल कसेही करून नेट वर मिळालेल्या इमेज एडीट करून दोन तीन हेडर इमेज बनवल्या. मित्रांमध्ये इमेलबाजी केली आणि सर्वांनी त्यातल्या त्यात ह्या हेडरला पसंती दर्शवली. इमेज लावून झाली आता पब्लीश कधी करायचा...कालच करणार होतो पण नंतर आठवले कि उद्या अक्षयतृतीया आहे चांगला मुहूर्त आहे. चांगल्या दिवशीच उदघाटन करूया.

आज चांगल्या मुहूर्तावर उद्घाटन करतोय. ह्या सोहळ्याला सध्या तरी मी आणि माझी बायकोच उपस्थित आहे. आणि अर्थातच सर्व हितचिंतकांचा पाठींबा आहेच. जसा आतापर्यंत मिळाला आहे तसाच पुढेही मिळेल हि सदिच्छा. आशा करतो कि माझा भोवरा ह्या ब्लॉग च्या अनोख्या दुनियेत कायम फिरत राहील. मराठी मंडळी, मराठी ब्लॉग विश्व, मराठी कॉर्नर, मराठी ब्लॉग जगत यांच्या मुळे जुन्या ब्लॉगला चांगले वाचक मिळाले त्याचं आणि त्यांच्या टीमचे आभार. माझा नवीन भोवरा ब्लॉग सुद्धा ते आपल्या परिवारात सामील करून घेतील अशी आशा करतो. जुना ब्लॉग आता फक्त इंग्लिश ब्लॉग लिहायला वापरेन.


वाईट एका गोष्टीचे वाटते कि जुन्या ब्लॉगला गेल्या चार महिन्यातच ६००० च्या वर भेटी मिळाल्या होत्य़ा (ते सुद्धा स्वत:चे पेज विजिट ब्लॉक करून) त्यावर आता पाणी सोडावे लागणार आहे. परत शुन्यातुन सुरुवात करायची आहे....आयुष्यात खूप वेळा करावी लागली आहे अशी....बघू परत सहा हजार करायला किती महिने लागताहेत.

तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे एकदा तरी नक्की भेट दया माझ्या नवीन ब्लॉगला...


भोवरा

Read More

Sunday, April 24, 2011

सचिन वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

चार दिवसापासून आमच्या नाक्यावर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करणारा एक मोठा बॅनर लावला होता. नशीब आमच्या राजकारणी लोकांना स्वतःचे बॅनर लावण्यापासून फुरसत मिळाली आणि नशीब क्रिकेटच्या देवाची आठवण झाली. 

आपल्या सचिनचा आज वाढदिवस. देव करो आमच्या ह्या देवाला उदंड आयुष्य लाभो. महाभारतात एकदा पहिले होते. जेव्हा भीष्म युद्धापूर्वी दुर्योधनाला समजावत असतात की पांडवांबरोबर युद्ध करू नकोस साक्षात भगवंत  (श्रीकृष्ण) त्यांच्या बाजूने आहे. मला नेहमी विचार पडायचा कि ह्यांना कसे समजत असेल की श्रीकृष्ण देवाचे रूप आहे. तीच गोष्ट श्रीरामाच्या बाबतीत होती. त्यावेळेची प्रजा, ऋषी हे रामाला भगवंताचे रूप मानायचे. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा कि ते देवाला कसे ओळखत असतील? साक्षात देवा बरोबर राहायला त्यांना कसे वाटत असेल? देवाचे चमत्कार बघताना काय मनात येत असेल? पण जसजसा मोठा होत गेलो आणि सचिन ला बघत गेलो. त्याच्या बॅटीतुन घडणारे चमत्कार पहिले आणि माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. 

image001ऍलन बॉर्डर ने जेव्हा गावस्करचा रेकोर्ड तोडला होता त्यावेळेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता. मला वाटत नाही हा रेकोर्ड जास्त दिवस माझ्या नावावर राहील. सचिन तेंडूलकर सारखे बॅटसमन सध्या क्रिकेट खेळत आहेत.त्यावेळेला तर सचिन खूप लहान होता. नुकताच बहरत होता. अजून त्याने आपले रंग पण दाखवले नव्हते. तरी सुद्धा बोर्डरने त्याच्यातल्या देवाला ओळखले होते.

गेले वीस बावीस वर्षे तो खेळतो आहे. कधी कोणाबरोबर भांडणे नाहीत, झगडे नाहीत, स्लेजिंग नाही, पोंटिंग सारखे प्रेस कॉन्फेरन्स घेऊन दुसऱ्या टीमवर कधी कमेंट नाहीत, कोणी कितीही टीका करुदेत कधी कोणाला उलटी उत्तर नाहीत, जे काही सांगायचे आहे त्याने ते त्याच्या बॅटनेच सांगितले. पाकिस्तानच्या सेमी फायनल आधी सुद्धा त्याने नवीन बॅट घेतल्या होत्या तेव्हा तो कितीतरी तास लाकडाच्या हातोडीने बॅटला ठोकत बसला होता. फक्त बॅट चा स्ट्रोक वाढवण्यासाठी. ह्या वयात पण तो धावा मिळवण्यासाठी एवढा उत्सुक असतो जेवढा एखादा नवीन भरती झालेला खेळाडू असतो. 

ग्रेट !! सिम्पली ग्रेट !!!

त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात माहिती आहे?

" मला वाटते माझ्या मुलाने सचिन तेंडूलकर बनावे." ब्रायन लारा.

"आम्ही इंडियाच्या टीम बरोबर नाही हरलो. आम्ही फक्त सचिन तेंडुलकर नावाच्या माणसाबरोबर हरलो"-मार्क टेलर.

"तुमच्या बरोबर काहीही वाईट घडू शकत नाही जर तुम्ही भारतातील विमानात असाल आणि सचिन तेंडूलकर तुमच्या सोबत असेल." हाशिम आमला.

" तो चालताना वापरायच्या काठी ने सुद्धा चांगला लेग ग्लान्स खेळू शकतो."- वकार युनूस.

"..जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज आहेत. १. सचिन तेंडूलकर आणि २. इतर सर्व."- अँडी फ्लॉवर.

' मी देव पहिला आहे. तो टेस्ट मध्ये भारतासाठी चवथ्या नंबरवर फलंदाजी करतो." - मॅथ्यु हेडन.

"मी स्वत:ला बघतो जेव्हा मी सचिन ला फलंदाजी करताना बघतो."- सर डॉन ब्रॅडमन.

"जेव्हा सचिन फलंदाजी करत असतो तेव्हा तुम्ही तुमचे गुन्हे आरामात करू शकता, कारण देव सुद्धा सचिनची फलंदाजी बघण्यात व्यस्त असतो." - ब्रिटीश मिडिया.

" मला क्रिकेट बद्दल काही माहिती नाही पण मी सचिनला खेळताना बघतो. मला त्याचे क्रिकेट आवडते म्हणून नाही तर त्यावेळेला माझ्या देशाचे उत्पादन ५% ने कमी का होते ते जाणून घेण्यासाठी." बराक ओबामा.

" सचिन, आम्हा सगळ्यांना बनायला आवडेल असा माणूस." अँड्रयु सायम्ंडने त्याच्या टी शर्ट वर लिहिले होते. सचिनने हा टी-शर्ट स्वत: साईन केला होता.

"तुझे पता है तुने किसका कॅच छोडा है."- वासिम अक्रमने अब्दुल रज्जाकला सचिन चा झेल सोडल्यावर.

" सचिन प्रतिभाशाली आहे. मी नश्वर आहे." - ब्रायन लारा.

" मी त्याला जेव्हा जास्त बघतो तेव्हा जास्त भ्रमित होतो कि मी जे बघतोय ती सचिनची सर्वात चांगली खेळी आहे का?"....एम. एल. जैसिम्हा.- पूर्व क्रिकेटर.

" मी शंभर टक्के सांगू शकते की सचिन एक मिनिट पण नाही खेळणार जेव्हा तो स्वत: क्रिकेट एन्जॉय करणार नाही. तो अजून ही तेवढंच वेडा आणि उत्सुक आहे क्रिकेट खेळण्यासाठी." -अंजली तेंडूलकर.

" इंडियामे आप एक बार पंतप्रधान को कोर्ट के कटघरेमे खडा कर सकते हो, सचिन को नही." नवज्योत सिंग सिद्धू.

" त्याची विकेट घेण्यासाठी तयारी न केलेली बरी कारण तुम्हाला वाईट तरी नाही वाटणार जेव्हा तो तुमच्या उत्कृष्ट बॉल वर जेव्हा चौकार मारतो."- ऍलन डोनाल्ड.

" शिमला वरून दिल्लीला ट्रेन ने जाताना मध्ये एक स्टेशन लागते. गाडी तेथे फक्त दोन मिनिटे थांबते. पण गाडी जास्त वेळ थांबली कारण सचिन ९८ वर खेळत होता. सर्व प्रवासी, रेल्वे ऑफिसर, मोटरमन सर्व जण सचिनचे शतक बघायला थांबले होते. हा प्रतिभाशाली खेळाडू भारतात वेळेला पण थांबवू शकतो." ... पीटर रेबौक - ऑस्ट्रेलियाई पत्रकार.

"नशीब क्रिकेट त्यावेळेला प्राचीन युगामध्ये नव्हते. नाहीतर क्रिकेट हे देवाचे नाव झाले असते आणि सचिन त्याचा अकरावा अवतार झाला असता" - हरि पटनायक

"सचिन कधीच चीटींग करू शकत नाही. तो क्रिकेट साठी महात्मा आहे जे गांधीजी राजकारणासाठी होते."
एनकेपी साळवे, पूर्व केंद्रीय मंत्री जेव्हा सचिन वर बॉल कुरतडल्याचा आरोप केला गेला होता तेव्हा.

" माझ्या वडिलांचे नाव पण सचिन तेंडूलकर आहे" - सचिनची मुलगी सारा.

" जर क्रिकेट राम असेल तर सचिन हनुमान आहे. रामाचा सर्वात मोठा शिष्य." एम एस धोनी.

" तो स्वत:ला कधी रागावू देत नाही. मि त्याला अजून रागाने बॅट आपटताना बघितले नाही जरी त्याला चुकीचे आउट दिले असले तरी सुद्धा. त्याने एक बाउल आईस क्रीम जास्त खाल्ले कि समजायचे कि तो रागात आहे किंवा टेन्शन मध्ये आहे." झहीर खान.

"बच्चे ! एक दिन तू बहुत बडा बनेगा. लेकिन वो टाईम पे तेरे पहिले कप्तान को मत भूलना." के. श्रीकांत.

" ग्रेग चापेल गांगुली के जैसे सचिन से भी छुटकारा पाना चाहते थे. लेकिन उनकी योजना विफल रही." दिलीप वेंगसरकर.

" तो नेहमी जिम ला जातो कधीच चुकवत नाही." एक टीम प्लेयर.

" तू अश्या चुकीच्या बॉलला का आउट होतोस ?" - अंजली तेंडूलकर जेव्हा सचिन ऑफ साईड चा फटका मारताना आउट व्हायचा.

"असे माझ्या बरोबरच का झाले मला अजून क्रिकेट खेळायचे आहे?" सचिन स्वत: आपल्या बायकोला म्हणाला जेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता आणि त्याला ऍडमिट केले होते.

अश्या ह्या ग्रेट माणसाबद्दल लिहायला बसलो तर पुढचा वाढदिवस येईल.
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार.

Read More

Thursday, April 14, 2011

एका रात्रीची गोष्ट...

तो नेहेमीप्रमाणे कामावरून घरी येत होता. आजही पाय लडखडत होते. चाळीच्या कॉर्नर पर्यंत मित्र सोडायला आला होता. आज पण नाही नाही म्हणता जास्त घेतली होती. आता तोंडाचा वास आला कि बायकोची कटकट चालू होईन. पोरांची रडारड चालू होईल. वैताग आलाय ह्या गरिबीचा, ह्या कामाचा, ह्या दररोजच्या कटकटीचा. तेच सारे विसरायला हे पिणे चालू झाले आणि आता सुटता सुटत नाही आहे. बायको पण समजून घेत नाही आहे. तिला वाटतेय कि मजा मारायला पितोय. मी कामावरच्या बायकांबरोबर बोललो तरी तिला संशय येतोय. माझ्यावर विश्वासच नाही. साला मला कोण समजूनच घेत नाही आहे. वैताग आलाय ह्या जगण्याचा.

धडपडत, कशाबशा पायऱ्या चढत तो चाळीतील आपल्या घरापर्यंत आला. दरवाजा ठोठावला. आतून 'बाबा आले' 'बाबा आले' असा पोरांचा आवाज आला. बायकोने दरवाजा उघडला. दारूचा भपकारा तिच्या नाकाला झोंबला तसा तिचा पारा चढला. धावत आलेल्या छोट्या पोराला तिने तसाच डोळे वर करून मागच्या मागे पिटाळला. कंबरेवर हात ठेवून तिने रागाने नवऱ्याला विचारले, "आलात आज पण पिऊन? तुम्हाला तर काही सांगून समजतच नाही इथे पोरांना शाळेत फी भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही खुशाल आपले ढोसून येताहेत. बायकोचे काही ऐकायचे नाही असेच ठरवले आहे वाटते?"

मोठी मुलगी पुढे आली आणि आईला म्हणाली, "अगं आई त्यांना आत तर येउदे."
"तू गप् ग !आली मोठी मला शिकवायला"...आई कडाडली.
तशी पोरगी गप् जाऊन पुस्तकात डोके घालून बसली. 

तो आत आला तसा उंबरठ्याला अडखळून धडपडला. एवढी घेतली होती कि बायकोने कपाळाला हात मारून दोन शिव्या घातल्या. बायकोने आणि मुलीने तसाच खांद्याला धरून वर उठवला आणि आतल्या झोपायच्या खोलीत  नेऊन झोपवला. 

सकाळी डोळ्यावर सूर्याची किरणे आली तशी त्याला जाग आली. घड्याळात बघितले साडे आठ वाजून गेले होते. आज पण बायकोने उठवले  नाही. आज पण कामाला लेट होणार. परत सायेबाच्या शिव्या खाव्या लागणार. उठून बेड वर बसला. डोके अजून जड होते.सर्व गरगरत होते. आता बायकोची कटकट चालू झाली कि अजून डोके उठणार आहे. पण आज बायकोचा आवाज येत नव्हता  तो तसाच डोके पकडून उठला. तेवढ्यात बायको समोर आली. चक्क हातात लिंबू पाणी घेऊन आणि म्हणाली, "हे घ्या ! जरा डोके हलके वाटेल". 

च्यामायला मी स्वप्नात तर नाही ना ? बायकोचा आवाज एवढा मृदू कसा झाला? लग्नानंतर पहिले काही दिवसच हा आवाज ऐकायला मिळाला होता. स्वत:लाच चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली. पण जे डोळ्यासमोर होते ते खरे होते. हातात खरच लीम्बुपानी चा ग्लास होता. एका घोटात त्याने पिऊन टाकला आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.

डोके पुसत बाहेर आला तर बेड वर त्याचे ऑफिस ला जायचे कपडे काढून ठेवले होते. शूज पोलिश करून ठेवले होते. तेव्हढ्यात बायको आली तिने हातातला टॉवेल खेचून घेतला आणि म्हणाली तुम्ही बसा खुर्ची वर मी पुसते तुमचे केस. तो आश्चर्यचकित !!!! बसला खुर्चीवर. 

डोके पुसता पुसता बायको म्हणाली,"लवकर तयारी करून या. आज नाश्त्याला तुमच्यासाठी कांदा पोहे केले आहेत. ते खावून घ्या आणि डब्याला पण तुमच्या आवडीचीच भाजी केली आहे आणि संध्याकाळी पण लवकर घरी या" टॉवेल त्याच्या हातात देऊन ती स्वयंपाक घरात निघून गेली.

आत तर तो पूर्ण चक्रावून गेला. रात्री असे काय झाले तो ते आठवायचा प्रयत्न करू लागला. पण रात्री एवढी चढली होती कि काही आठवायलाच तयार नव्हते. एवढेच आठवले कि आपल्याला बायकोने आणि पोरीने उचलून आतल्या खोलीत उचलून आणले. तो पोरीकडे गेला आणि विचारले, "काय ग !! तुझ्या आई ला मध्येच काय झाले? एका रात्रीत अशी अचानक कशी बदलली?"

पोरगी म्हणाली, "बाबा ! काल आम्ही तुम्हाला बेड वर नेऊन टाकले. मी तुमचे शूज काढत होती आणि आई तुमचे ऑफिसचे कपडे काढत होती, तेव्हढ्यात तुम्ही ओरडला कि नको नको बाई ! माझे कपडे काढू नका. माझे लग्न झालेले आहे. माझी घरी एक बायको आहे. दोन मुले आहेत. प्लीज माझे कपडे काढू नका. प्लीज......"

तो काय समजायचे ते समजून गेला.

Read More

Friday, April 8, 2011

अण्णांसाठी पत्र

प्रिय अण्णा,

anna-hazare_040711101854_20110408060620_254x195
अण्णा हजारे लोकपाल साठी उपोषण करताना
अहो अण्णा ! हे काय करायला बसला आहेत तुम्ही....आतापर्यंत फक्त महाराष्ट्राची साफसफाई करत होता आता थेट दिल्लीत जाऊन देशाची साफसफाई करायला घेतली आहेत तुम्ही. अहो कसे काय जमणार तुम्हाला ? अशाने भ्रष्टाचार चा राक्षस संपणार आहे का ? अहो भ्रष्टाचार तर आमच्या रक्ता-रक्तात भरला आहे. असा एक दिवस जात नाही कि आमच्या देशात भ्रष्टाचार उघडकीस आला नाही. तुम्ही उपोषण करा नाहीतर दांडी यात्रा करा, आमच्या भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी बाबूंना काही फरक नाही पडत. अहो ! तुम्ही भुकेने मेलात तरी त्यांना काही फरक नाही पडणार. अहो आता येणारी नवी जनरेशन च्या अंगातहि त्यांच्या बापाने केलेले भ्रष्टाचाराचे जीन्स आपोआपच येताहेत. पुढे जाऊन हीच जनरेशन भ्रष्टाचाराचे रेकोर्ड करणार आहे.

अहो कुठले कुठले डीपार्टमेंट तुम्ही साफ करणार? असे कुठले डीपार्टमेंट राहिले आहे ज्यात भ्रष्टाचार होत नाही? समाजाशी जास्त संबधित असलेले पोलीस खाते, फायर ब्रिगेड, गृह खाते, म्युन्सिपालीटी सर्व भ्रष्टाचाराने पोखरली आहेत.तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे त्याला नवीन जनरेशन चा सपोर्ट मिळेल ह्यात काही शंकाच नाही पण ते सर्व आपापले काम धंदा सोडून तुमच्या बरोबर दिल्लीला थोडीच येणार आणि तुमच्या बरोबर उपोषणाला थोडीच बसणार आहेत?

अहो अण्णा पहिले म्हणजे तुमचे टायमिंग जरा चुकले. वर्ल्डकप चा जोश नुकताच कुठे शरीरात भिनत होता आणि परत आयपीएल चालू होतेय. क्रिकेट ह्या देशाचा धर्म, जात, पात, श्वास आहे. अहो आयपीएल चे बिगुल वाजले कि तुम्हाला हे सर्व लोक विसरून जातील. फेसबुक, ओर्कुट आणि कट्ट्यावर फक्त धोनी, युवराज, सचिनच्याच चर्चा होतील. कोण हे अण्णा ? छोड मॅच देख असे बोलायला कमी नाही करणार.

तुम्हाला मध्ये फक्त  ५/६ दिवसच होते. तुम्ही आता चुकीच्या वेळेला उपोषणाला बसला आहात. तुम्हाला वाटले असेल कि जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात तुम्हाला निकाल भेटेल?  अहो तुम्ही कदाचित विसरला असाल कि ह्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बॉम्बस्फोट होऊन मृत्युमुखी पडतो आणि त्याची केस १५ वर्षे चालते तिथे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा? राष्ट्रपती नंतर पंतप्रधान ह्या देशातले दुसरे महत्वाचे पद. हे पद आपल्या भारताचे पूर्ण जगात प्रतिनिधित्व करते. अश्या पंतप्रधानाच्या मृत्यूची केस कोर्टात १५ वर्षे चालते मग तुम्ही विचार करा कि आपले कायदा आणि गृह खाते किती सक्षम आहे ते.  तरी नशीब त्या श्रीलंकेने त्या प्रभाकरन ला ठार मारले आणि राजीव गांधीची केस बंद झाली नाहीतर ती अजून चालूच राहिली असती.

अहो तुम्ही ज्या लोकपाल साठी हट्ट धरलाय त्यावर निवडून येणारी पण माणसेच असतील हो. उद्या त्यानीच भ्रष्टाचार केला तर तुम्ही परत उपोषणाला बसणार का ? तुम्ही जो हट्ट धरलाय तो योग्यच आहे ह्या लोकपाल समिती मध्ये अर्धी सरकारची आणि अर्धी जनतेची माणसे हवीत आणि ते सुद्धा उच्च क्षिक्षितच हवी ज्यांना समाजाची आणि बऱ्या वाईटाची चांगली जाण असावी. एका बाबतीत तुम्हाला मानले कि तुम्ही दोन बॉल मध्येच  शरद रावांची विकेट काढली. त्यांच्या सारख्या मातब्बर राजकारण्याची विकेट काढली त्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात.

अहो भ्रष्टाचार आमच्या जन्मापासून ते स्मशानापर्यंत सोबत आहे. जन्माला आल्यावर पहिले नर्स/ आया च्या हाती पैसे टेकवा नाहीतर तुमची आणि तुमची बाळाची ते काळजी बरोबर घेणार नाही, जन्माची नोंद करायची असेल आणि जन्माचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याला लाच द्यावी लागणार, पुढे बाळ मोठा झाला त्याला शाळेत घालायचे आहे तर शाळेच्या ऐपती प्रमाणे (तुमच्या ऐपती प्रमाणे नाही ) तुम्हाला डोनेशन द्यावे लागणार. जेवढी शाळा मोठी तेवढे डोनेशन जास्त. पुढे कॉलेज ला डोनेशन, त्याला इंजिनिअरिंग ला जायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल त्या प्रमाणे डोनेशन रूपी लाच द्यावी लागते, पुढे मोटार सायकल/गाडी  घ्यायची असेल तर लायसन्स काढायला लाच द्यायची, गाडीचे रजिस्ट्रेशन करायला लाच द्यायची, पुढे तर जसे जसे सिग्नल तोडेल, कायदे मोडेल तस तसे तोच लाच द्यायला शिकतो. मग नोकरी लागायला लाच, त्यात जर सरकारी नोकरी असेल तर विचारायलाच नको. लाच देणारे हात कधी घ्यायला चालू होतात ते त्याचे बिचाऱ्यालाच समजत नाही,घर घ्यायचे असेल तर लाच द्यावी लागते, पुढे रिटायर्ड झाल्यावर आपल्याच हक्काचे पैसे परत मिळायला लाच द्यावी लागते, हॉस्पिटल मध्ये चांगला बेड मिळण्यासाठी लाच द्यावी लागते, मरताना बॉडी आपल्याच नातेवाईकांच्या हातात मिळायला लाच द्यावी लागते, मेल्यावर स्मशानात लवकर नंबर लागावा ह्या साठी लाच, मेल्यावर जाळायला सुद्धा चिरीमिरी द्यावी लागते, मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीहि लाच दिल्याशिवाय मिळत नाही. पण अण्णा तुम्ही लढा!! आम्ही सुधारलो नाही तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कधी न कधी तुम्ही जिंकलाच.

आता आम्हाला तुमच्या या उपक्रमाला साथ द्यायला दिल्लीला वगैरे यायला येता येणार नाही पण  आम्ही आमच्या परीने फेसबुक, ओर्कुट वगैरे साईट वर किंवा ह्या लिंकवर क्लिक ( http://www.avaaz.org/en/stand_with_anna_hazare_fb/?copy) करून तुम्हाला साथ देऊ. चक्क तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा पाठींबा दिला आहे तुम्ही घाबरू नका. भले काही नेते तुमच्या नावाने शंख करूदे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिंकलाच असे समजा. आम्ही तुमच्या नावाने प्रिंट केलेल्या गांधी टोप्या घालू, एकमेकांना लिंक फोरवर्ड करून सबस्क्रायीब करायला सांगू, तुमच्या समर्थनासाठी एक दिवसाचा उपवास करू, जमले तर आयपीएल बघायचे पण टाळू, पण तुम्ही लढा.

अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!!!

तुमचाच पाठीराखा
आशिष सावंत.

Read More

Monday, April 4, 2011

बॉम्बे नाही रे....मुंबई !!!

च्यायला !!! कधी कधी डोकेच फिरते..जेव्हा कोणी सारखे सारखे बॉम्बे बॉम्बे करत बसले कि. माझ्या समोर जेवढे जण बॉम्बे बोलतात त्या सर्वाना मी टोकतो आणि मुंबई बोलायला सांगतो. काही जण त्यावरहि वाद घालत बसतात. जास्त डोक्यात शिरला की मग ओरडून बोलायचे मग साले लाईनवर येतात.  हे लोक साले आपल्या भावनांचा आदर का नाही ठेवत. किती वेळा एकच गोष्ट ओरडून सांगायची. 

mumbaiऑफिस मध्ये पण साऊथ इंडिअन बॉस असेल तर तो मुद्दाम बॉम्बे बोलणार. एकदा समजावून सांगितले तरी मुद्धाम परत बोलणार आणि बॉम्बे बोलला कि हळूच डोळ्याच्या एका कोपऱ्यातून आपल्याकडे बघणार. माझ्या ऑफिस मध्ये तर देशातल्या सर्व प्रांतातून आलेले लोक आहेत. कोलकाता वाले बॅंगोली लोक कोलकाता ला कलकत्ता बोलले कि टोकतात. पण बॉम्बे चे मुंबई बोलायला सांगितले कि विसरतात. निदान ते लोक आपली चूक सुधारून परत मुंबई तरी बोलतात. पण साऊथ वाले जरा हि ऐकत नाही. ते कशाला, काही मराठी लोक जेव्हा बिजिनेसची ऑफर घेऊन माझ्या ऑफिस मध्ये येतात तेव्हा बॉसशी इंग्लिशमध्ये बोलताना जाणून बुजून  मुंबईच्या ऐवजी बॉम्बे बोलतात. का ?? तर स्टेटस दाखवायला. तेच बॉस च्या केबिन मधून बाहेर आले कि माझ्याशी बोलताना मुंबई बोलतात. साल्यांना एवढी कसली लाज आली आहे? आपल्या भाषेत बोलायला आपल्याच राज्यात कसली आली आहे भीती ? अरे तुमच्या सारख्या लोकांची इथे नाही चालणार तर कुठे चालणार? तुमच्यामध्ये तर दम नाही आहे कि दुसऱ्या राज्यात जाऊन मराठी बोलायची, निदान आपल्या राज्यात तरी न घाबरता बोला. ह्यांच्या सारख्या मुठभर लोकांमुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस मागे पडतो आणि जे पुढे जातात त्यांचे हसे तरी होते नाही तर राज ठाकरे तरी होतो. फिरवताहेत बिचाऱ्याला महाराष्ट्रभर ठिकठिकाणी केसेस टाकून.


कलकत्त्याचे जेव्हा कोलकाता केले होते तेव्हा त्याच दरम्यान मी माझ्या कोलकाता ऑफिस मध्ये एका रे आडनावाच्या माणसाला फोन केला होता. तेव्हा माझ्या तोंडून बोलताना कलकत्ता निघाले तेव्हा लगेच त्याने मला सांगितले कि आता कोलकाता नाव केलेले आहे तेव्हा तेच नाव घे. मग लगेच त्याच्या बोलण्याचा आदर ठेवून लगेच दुरुस्ती केली आणि जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर बोलणे झाले तेव्हा तेव्हा आवर्जून कोलकाता बोललो. त्याने सुद्धा माझ्याशी ह्या गोष्टीवरून चांगली दोस्ती केली. 

तीच गोष्ट चेन्नई च्या बाबतीत होते तेथे चुकूनहि लोक मद्रास बोलत नाही आणि दुसरा बोलला तर लगेच त्याला चूक दुरुस्त करायला लावतात. मराठी लोकांमध्ये अशी अस्मिता केव्हा जागणार? कोचीन चे कोची केले गेले, तंजोर चे तंजावर केले गेले, वाईझाग चे विशाखापट्टनाम केले गेले. तेथील कोणीही लोक जुने नाव घेत नाही आणि घेऊ देत नाही. त्यांच्या राज्यात नाहीच नाही पण आपल्या राज्यात हि नाही घेऊ देत. बघा अनुभव घ्या कधी !!!आणि आपण साले एक बॉम्बे चे मुंबई बोलू शकत नाही ???

साऊथ लोकांना अस्मिता शिकवावी लागत नाही किंवा भाषेच्या अस्मितेचा आव आणावा लागत नाही. आम्ही आपले 'मराठी अस्मिता', 'मराठी बाणा' असेल शब्द वापरून ब्लॉग लिहिणार, साईट बनवणार, मोठ्या मोठ्या गप्पा मारणार, शिवरायांच्या फोटो सोबत 'मी मराठी' मराठी बाणा वगैरे शब्द लिहून टी शर्ट घालणार, छान छान मराठी वोलपेपर डेस्कटोप वर लावणार पण बोलताना बॉम्बेच बोलणार. आम्ही मराठी मोडणार पण वाकणार नाही.  अरे पण आपण आपल्याच घरात घाण करतोय हे का दिसत नाही ह्यांना? अशा काही लोकांमुळेच परप्रांतीयांचे चालते आणि ते आपल्या डोक्यावर येऊन पोळ्या थापाताहेत.

मध्ये करण जोहर च्या एका सिनेमा मध्ये बॉम्बे वापरले गेले होते. राज साहेबांनी आवाज दिल्यावर करण जोहर ने येऊन माफी मागितली होती. त्यावर राज साहेबांवर किती टीका झाली होती. समांतर सरकार चालवायचा प्रयत्न करताहेत, काही मराठे राज्यकर्ते तर म्हणत होते, करण जोहर ने जर सुरक्षा मागितली असती तर आम्ही दिली असती. आता काय बोलणार ह्या षंढ राजकारण्यांना ? जेव्हा मराठीचा, महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा मुद्दा येतो तेव्हा तरी आपले मतभेद विसरून सर्वानी एकत्र यायला हवे ना ?

आता तरी सुधरा रे बाबांनो !!! \
मराठी असल्याचा नुसता गर्व नकोय तर माज असला पाहिजे.


आतापर्यंत आपल्या देशात ह्या शहरांची नावे बदलली गेली आहेत.
मुंबई (आधी बॉम्बे, नवीन नाव १९९५ पासून)
चेन्नई (आधी मद्रास, नवीन नाव १९९६ पासून)
कोलकाता (आधी कलकत्ता, नवीन नाव २००१ पासून)
विजयवाडा (आधी बेजवाडा)
विशाखापट्टनम (आधी वाल्तर, त्याही आधी विझाग)
कडपा (आधी कडप्पाह, नवीन नाव २००५ पासून)
शिमला (आधी सिमला )
कानपूर (आधी कावन्पोर, नविन नाव १९४८)
थीरुवनांतपुरम (आधी त्रिवेंद्रम, नवीन नाव १९९१)
पुणे (आधी पुना)
कोची (आधी कोचीन, नवीन नाव १९९६)
सागर (आधी सौगोर)
जबलपूर (आधी जब्बलपोर )
नर्मदा (आधी नरबुद्दा)
पुडुचेरी (आधी पोन्दिचेर्री, नवीन नाव २००६)
इंदोर (आधी इंदूर)
कोझिकोडे (आधी कालिकत )
उदगमंडलाम (आधी ओतकामुंद )
तिरुचिरापल्ली (आधी त्रिचीनोपोली)
तंजावर (आधी तंजोर)
जास्त माहिती ह्या लिंकवर विकिपेडिया 

Read More