Condom !!


Readers are requested to read this post on their onus only. As a author this post doesn’t contain any adult material. Still if readers feels so.... then Close window “X” option is available for all.



That day I was listening songs on mobile FM Radio. After song was cover, one advertisement(ad) started, so as usual I changed radio station. On another channel also one ad was going. I moved to third station. There also one advt was going on. On second station, advt of one Condom company was just ending and I heard last word of ad “……..Condom”. On third station one cement companies ad was ending. Their last sentence was, “………….Sadiyon ke liye” If  both the words are heard within seconds it heard as “…..Condom, sadiyon ke liye”

Oh ! that’s amazing, I got some fishy idea. Almost all things which we are using in our day today life are advertised on Radio and TVs and almost all the products are sold with products’ famous tag line which covers from toothbrush, salt, clothes, cars etc almost everything. For ex. Raymond carry tag line of ‘Raymond, The Complete Man’ or Nokia with ‘Connecting People’

Now suppose all these companies started to produce Condoms by keeping their same tag line….then just imagine…….I am giving some examples of such marketing line. I am not telling anything…you just read, think and enjoy.

Read More

Blogger new look

Good  !!!
Bloogger have changed their design...It's good to see...very light design.....little bit difficult to handle because of new design....but good!!! change is required in life

Read More

नकळत एकदा...


आजपण नेहमीप्रमाणे आईने त्याला औषधाच्या गोळ्या काढून दिल्या. आईला नको म्हणून समजावून सांगून सुद्धा तिने गोळ्या आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. तिला सांगून तरी काय फायदा कि आता ह्या गोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यांनी जे काम करायचे ते त्यांचे करून झाले आहे. आता ह्यांचा काही उपयोग नाही पण जाऊदेत तिला तरी कशाला दुखवायचे. म्हणून त्याने गपचूप गोळ्या खावून घेतल्या.आईने  त्याच्या बारीक कापलेल्या केसावरून प्रेमाने हात फिरवला. गोळ्या खाल्ल्यावर ती निघून गेली.


Read More

नव्या नावाने ....

नावात काय आहे ? असे खूप जण म्हणत असले तरी माझ्या अनुभवानुसार नावातच सर्व काही आहे. एक नाव पुरेसे असते खूप काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी. त्यामुळे ब्लॉग ला एक चांगले नाव असावे हि खूप दिवसापासून इच्छा होती. आशिष सावंत हे नाव किती दिवस लोकांच्या लक्षात राहील? स्वत:च्या नावावर ब्लॉग लिहायला असेहि आवडतच नव्हते. काहीतरी एक युनिक नाव शोधणे चालू होते.


माझा आताचा ब्लॉग चालू करून दोन/ सव्वा दोन वर्षे झाली. जानेवारी २००९ मध्ये ब्लॉग लिहायला सुरुवात झाली पण दीड वर्षात फक्त ३/४च ब्लॉग लिहून झाले. ह्या दीड वर्षात आयुष्यात खूप स्थित्यंतरे झाले. आयुष्याचे मोठ मोठे आणि काही कडवे निर्णय पण घ्यावे लागले. खूप काही मोठे व्यवहार एकट्यालाच करावे लागले. ह्याच काळात दोन मोठे अपघातहि झाले. सुदैवाने दोन्ही अपघातातून वाचलो. त्याच्या जखमा आणि दुखणे अजून ही अंगावर आहे. आतापर्यंतचा आयुष्यातला सर्वात कठीण आणि खडतर काळ होता. त्या झटक्यातून सावरायला कमीत कमी पुढची ८/९ महिने तरी जावी लागली. ह्या काळात हातून काहीच निर्मिती झाली नाही. अगदी महिनोन महिने इंटरनेटला हात पण लावता आला नाही. जमेची बाजू एकची की नशिबाने आणि परिस्थितीने एवढे अनुभव दिले कि मॅच्युरिटी लेवल जवळपास दहा वर्षांनी वाढली.


जरा गाडी रुळावर आल्यावर सर्वात आधी लॅपटॉप घेतला अगदी टीवी घेण्याआधी सुद्धा. इंटरनेट घेतले आणि परत ब्लॉगिंग ला सुरुवात झाली. जुन्या ब्लॉगवरुनच गाडी पुढे चालायला लागली. पण स्वत:च्या नावाने ब्लॉग बनवण्यापेक्षा काहीतरी युनिक असे नाव शोधत होतो. पण मनासाखे मिळतच नव्हते. एक छोटे, उच्चारायला सोपे, टाइप करायला सहज असणारे नाव शोधत होतो. काही नावे आवडली पण काही महाभागांनी आधिच अडकवुन ठेवली होती. ब्लॉग तर काही लिहिले नव्हते फक्त नावे बुक्ड करुन ठेवली होती. अगदी “बुक्ड” (booked) नाव सुद्धा. बघा चेक करुन. जवळपास ३ महिन्यात पत्नि, बहिण आणि मित्रांनी हजारो नावे तरी सुचवली असतील पण काहीच पसंत पडत नव्हते. काही दिवसापूर्वी एका शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मराठी डिक्शनरी उघडली होती. तेव्हा सुचले कि डिक्शनरीच काढून बघूया काही नावे भेटताहेत का ? साडेचारशे पानाची डिक्शनरी, त्यात शोधून शोधून कसे शोधणार? शेवटी एक चान्स घ्यायचा म्हणून कुठल्यातरी एका पानावर हात ठेवायचा आणि त्यात काही नाव दिसते का बघायचे असे ठरवले आणि लहान मुले करतात तसे राम लक्ष्मण सीता करत एका पानावर हात ठेवला. पान निघाले "भ" ह्या अक्षराचे.

म्ह्टले झाले कल्याण !!! आता काही मिळत नाही. पण नजर एका शब्दावर जाऊन थांबली आणि मन एकदम फिल्मी स्टाईलमध्ये वीस वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेले. लहानपणी हि वस्तू घेऊन खूप खेळलो होतो. एप्रिल मेच्या सुट्टीत तर खिशात घेऊनच फिरायचो. जमिनीवर असो, हातावर असो, पोटावर असो कुठेही फिरवता यायची हि वस्तू. लोखंडी कानस वर धार करून तिचे टोक अजून टोकेरी करायचो जेणेकरून तो जास्त वेळ फिरेल आणि खेळताना सुद्धा दुसर्‍याच्या वस्तू वर नेम धरून मारता पण येईल. त्यावेळेला लाकडामध्ये सुंदर रंगकाम केलेलं मिळायचे आणि काही ठिकाणी प्लास्टिकचे पण मिळायला सुरुवात झाली होती. पण लाकडाचे सौंदर्य कायम राहिले. त्यासाठी लागणार्‍या रश्शीला एखादा थमसअप किंवा पेप्सीचा बिल्ला लावायचा आणि अख्ख्या चाळी मध्ये फिरवत राहायचो. ह्या वस्तूने कमीत कमी खर्चात आतापर्यंत फक्त आनंदच दिला आहे ते सुद्धा बदल्यात काही न मागता. मी कुठल्या वस्तूबद्दल म्हणतोय ह्याचा अंदाज आला असेल एव्हाना. नुसत्या 'त्या' शब्दावर माझ्या एवढ्या वीस वर्षापूर्वीच्या आठवणी चाळवल्या गेल्या अगदी ढवळल्या गेल्या.....विचार केला कि ह्या पेक्षा चांगले नाव भेटनारच नाही....." भोवरा ".
भोवरा ह्या शब्दाबरोबर कितीतरी जणांच्या गोड आठवणी असतील ना ?
सुदैवाने ब्लॉग कोणी रजिस्टर पण केला नव्हता. पहिले बायक़ोला फोन केला, तिला विचार सांगितले ...तिने हुश्श्य केले....म्हणाली, एकदाचे तुझ्या पसंतीचे नाव भेटले तुला. आणि ते सुद्धा आम्ही सुचवण्यापेक्षा तुलाच सुचले आहे ते नशीब. मित्रांना पाठवले त्यांनीही सहमती दर्शवली. जिगर ला सांगितले, माझ्या स्वभावाला आणि भोवर्‍याला साधर्म्य होईल अशी एक चारोळी लिहून दे गुजराती असून हि त्याने पाच मिनिटात मराठीत दोन तीन चारोळ्या लिहून पाठवल्या. त्यात व्याकरणाचे बदल करत हि चारोळी फायनल केली. (जिगर ला धन्यवाद देवून शिवी देणार नाही.)

आपल्याच धुंदीत फिरतोय मी,
मदमस्त होऊन जगतोय मी,
बेधुंद वाऱ्यातही स्थिर आहे मी,
दुनिया म्हणते की भोवरा आहे मी.

मग काय ! त्या रात्री लगेच ब्लॉग रजिस्टर केला. जुना ब्लॉग सर्व पोस्ट सहित एक्सपोर्ट केला आणि नवीन ब्लॉग मध्ये इम्पोर्ट केला. १८ ते २० मिनिटे लागली. पण सर्व सुरळीत पार पडले अगदी काही एरर(error) न येता. काही विजेट आणि स्क्रिप्ट कॉपी पेस्ट झाल्या नाही त्या मॅन्युअली कराव्या लागल्या. बाकी सगळे झाले. पण तरी सुद्धा ब्लॉग पब्लिश करायला दोन आठवडे वाट बघावी लागली कारण हेडर मध्ये लावायला भोवर्‍याचा चांगला फोटो मिळत नव्हता.

जे उपलब्ध होते ते कॉपीराईट होते. विचार केला स्वत:च भोवर्‍याचा फोटो काढून ब्लॉग वर टाकावा. घरात जुने भोवरे होते पण शोधून काहि मिळत नव्हते. कितीतरी दुकाने पालथी घातली पण लाकडी भोवरे मिळणेच बंद झाले. सर्वांकडे प्लास्टिक मधले होते. ते सुद्धा खास नव्हते. एक मे ला, महाराष्ट्र दिनी ब्लॉग पब्लिश करायचा विचार होता पण जमलेच नाही. शेवटी काल कसेही करून नेट वर मिळालेल्या इमेज एडीट करून दोन तीन हेडर इमेज बनवल्या. मित्रांमध्ये इमेलबाजी केली आणि सर्वांनी त्यातल्या त्यात ह्या हेडरला पसंती दर्शवली. इमेज लावून झाली आता पब्लीश कधी करायचा...कालच करणार होतो पण नंतर आठवले कि उद्या अक्षयतृतीया आहे चांगला मुहूर्त आहे. चांगल्या दिवशीच उदघाटन करूया.

आज चांगल्या मुहूर्तावर उद्घाटन करतोय. ह्या सोहळ्याला सध्या तरी मी आणि माझी बायकोच उपस्थित आहे. आणि अर्थातच सर्व हितचिंतकांचा पाठींबा आहेच. जसा आतापर्यंत मिळाला आहे तसाच पुढेही मिळेल हि सदिच्छा. आशा करतो कि माझा भोवरा ह्या ब्लॉग च्या अनोख्या दुनियेत कायम फिरत राहील. मराठी मंडळी, मराठी ब्लॉग विश्व, मराठी कॉर्नर, मराठी ब्लॉग जगत यांच्या मुळे जुन्या ब्लॉगला चांगले वाचक मिळाले त्याचं आणि त्यांच्या टीमचे आभार. माझा नवीन भोवरा ब्लॉग सुद्धा ते आपल्या परिवारात सामील करून घेतील अशी आशा करतो. जुना ब्लॉग आता फक्त इंग्लिश ब्लॉग लिहायला वापरेन.


वाईट एका गोष्टीचे वाटते कि जुन्या ब्लॉगला गेल्या चार महिन्यातच ६००० च्या वर भेटी मिळाल्या होत्य़ा (ते सुद्धा स्वत:चे पेज विजिट ब्लॉक करून) त्यावर आता पाणी सोडावे लागणार आहे. परत शुन्यातुन सुरुवात करायची आहे....आयुष्यात खूप वेळा करावी लागली आहे अशी....बघू परत सहा हजार करायला किती महिने लागताहेत.

तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे एकदा तरी नक्की भेट दया माझ्या नवीन ब्लॉगला...


भोवरा

Read More

सचिन वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

चार दिवसापासून आमच्या नाक्यावर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करणारा एक मोठा बॅनर लावला होता. नशीब आमच्या राजकारणी लोकांना स्वतःचे बॅनर लावण्यापासून फुरसत मिळाली आणि नशीब क्रिकेटच्या देवाची आठवण झाली. 

आपल्या सचिनचा आज वाढदिवस. देव करो आमच्या ह्या देवाला उदंड आयुष्य लाभो. महाभारतात एकदा पहिले होते. जेव्हा भीष्म युद्धापूर्वी दुर्योधनाला समजावत असतात की पांडवांबरोबर युद्ध करू नकोस साक्षात भगवंत  (श्रीकृष्ण) त्यांच्या बाजूने आहे. मला नेहमी विचार पडायचा कि ह्यांना कसे समजत असेल की श्रीकृष्ण देवाचे रूप आहे. तीच गोष्ट श्रीरामाच्या बाबतीत होती. त्यावेळेची प्रजा, ऋषी हे रामाला भगवंताचे रूप मानायचे. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा कि ते देवाला कसे ओळखत असतील? साक्षात देवा बरोबर राहायला त्यांना कसे वाटत असेल? देवाचे चमत्कार बघताना काय मनात येत असेल? पण जसजसा मोठा होत गेलो आणि सचिन ला बघत गेलो. त्याच्या बॅटीतुन घडणारे चमत्कार पहिले आणि माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. 

image001ऍलन बॉर्डर ने जेव्हा गावस्करचा रेकोर्ड तोडला होता त्यावेळेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता. मला वाटत नाही हा रेकोर्ड जास्त दिवस माझ्या नावावर राहील. सचिन तेंडूलकर सारखे बॅटसमन सध्या क्रिकेट खेळत आहेत.त्यावेळेला तर सचिन खूप लहान होता. नुकताच बहरत होता. अजून त्याने आपले रंग पण दाखवले नव्हते. तरी सुद्धा बोर्डरने त्याच्यातल्या देवाला ओळखले होते.

गेले वीस बावीस वर्षे तो खेळतो आहे. कधी कोणाबरोबर भांडणे नाहीत, झगडे नाहीत, स्लेजिंग नाही, पोंटिंग सारखे प्रेस कॉन्फेरन्स घेऊन दुसऱ्या टीमवर कधी कमेंट नाहीत, कोणी कितीही टीका करुदेत कधी कोणाला उलटी उत्तर नाहीत, जे काही सांगायचे आहे त्याने ते त्याच्या बॅटनेच सांगितले. पाकिस्तानच्या सेमी फायनल आधी सुद्धा त्याने नवीन बॅट घेतल्या होत्या तेव्हा तो कितीतरी तास लाकडाच्या हातोडीने बॅटला ठोकत बसला होता. फक्त बॅट चा स्ट्रोक वाढवण्यासाठी. ह्या वयात पण तो धावा मिळवण्यासाठी एवढा उत्सुक असतो जेवढा एखादा नवीन भरती झालेला खेळाडू असतो. 

ग्रेट !! सिम्पली ग्रेट !!!

त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात माहिती आहे?

" मला वाटते माझ्या मुलाने सचिन तेंडूलकर बनावे." ब्रायन लारा.

"आम्ही इंडियाच्या टीम बरोबर नाही हरलो. आम्ही फक्त सचिन तेंडुलकर नावाच्या माणसाबरोबर हरलो"-मार्क टेलर.

"तुमच्या बरोबर काहीही वाईट घडू शकत नाही जर तुम्ही भारतातील विमानात असाल आणि सचिन तेंडूलकर तुमच्या सोबत असेल." हाशिम आमला.

" तो चालताना वापरायच्या काठी ने सुद्धा चांगला लेग ग्लान्स खेळू शकतो."- वकार युनूस.

"..जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज आहेत. १. सचिन तेंडूलकर आणि २. इतर सर्व."- अँडी फ्लॉवर.

' मी देव पहिला आहे. तो टेस्ट मध्ये भारतासाठी चवथ्या नंबरवर फलंदाजी करतो." - मॅथ्यु हेडन.

"मी स्वत:ला बघतो जेव्हा मी सचिन ला फलंदाजी करताना बघतो."- सर डॉन ब्रॅडमन.

"जेव्हा सचिन फलंदाजी करत असतो तेव्हा तुम्ही तुमचे गुन्हे आरामात करू शकता, कारण देव सुद्धा सचिनची फलंदाजी बघण्यात व्यस्त असतो." - ब्रिटीश मिडिया.

" मला क्रिकेट बद्दल काही माहिती नाही पण मी सचिनला खेळताना बघतो. मला त्याचे क्रिकेट आवडते म्हणून नाही तर त्यावेळेला माझ्या देशाचे उत्पादन ५% ने कमी का होते ते जाणून घेण्यासाठी." बराक ओबामा.

" सचिन, आम्हा सगळ्यांना बनायला आवडेल असा माणूस." अँड्रयु सायम्ंडने त्याच्या टी शर्ट वर लिहिले होते. सचिनने हा टी-शर्ट स्वत: साईन केला होता.

"तुझे पता है तुने किसका कॅच छोडा है."- वासिम अक्रमने अब्दुल रज्जाकला सचिन चा झेल सोडल्यावर.

" सचिन प्रतिभाशाली आहे. मी नश्वर आहे." - ब्रायन लारा.

" मी त्याला जेव्हा जास्त बघतो तेव्हा जास्त भ्रमित होतो कि मी जे बघतोय ती सचिनची सर्वात चांगली खेळी आहे का?"....एम. एल. जैसिम्हा.- पूर्व क्रिकेटर.

" मी शंभर टक्के सांगू शकते की सचिन एक मिनिट पण नाही खेळणार जेव्हा तो स्वत: क्रिकेट एन्जॉय करणार नाही. तो अजून ही तेवढंच वेडा आणि उत्सुक आहे क्रिकेट खेळण्यासाठी." -अंजली तेंडूलकर.

" इंडियामे आप एक बार पंतप्रधान को कोर्ट के कटघरेमे खडा कर सकते हो, सचिन को नही." नवज्योत सिंग सिद्धू.

" त्याची विकेट घेण्यासाठी तयारी न केलेली बरी कारण तुम्हाला वाईट तरी नाही वाटणार जेव्हा तो तुमच्या उत्कृष्ट बॉल वर जेव्हा चौकार मारतो."- ऍलन डोनाल्ड.

" शिमला वरून दिल्लीला ट्रेन ने जाताना मध्ये एक स्टेशन लागते. गाडी तेथे फक्त दोन मिनिटे थांबते. पण गाडी जास्त वेळ थांबली कारण सचिन ९८ वर खेळत होता. सर्व प्रवासी, रेल्वे ऑफिसर, मोटरमन सर्व जण सचिनचे शतक बघायला थांबले होते. हा प्रतिभाशाली खेळाडू भारतात वेळेला पण थांबवू शकतो." ... पीटर रेबौक - ऑस्ट्रेलियाई पत्रकार.

"नशीब क्रिकेट त्यावेळेला प्राचीन युगामध्ये नव्हते. नाहीतर क्रिकेट हे देवाचे नाव झाले असते आणि सचिन त्याचा अकरावा अवतार झाला असता" - हरि पटनायक

"सचिन कधीच चीटींग करू शकत नाही. तो क्रिकेट साठी महात्मा आहे जे गांधीजी राजकारणासाठी होते."
एनकेपी साळवे, पूर्व केंद्रीय मंत्री जेव्हा सचिन वर बॉल कुरतडल्याचा आरोप केला गेला होता तेव्हा.

" माझ्या वडिलांचे नाव पण सचिन तेंडूलकर आहे" - सचिनची मुलगी सारा.

" जर क्रिकेट राम असेल तर सचिन हनुमान आहे. रामाचा सर्वात मोठा शिष्य." एम एस धोनी.

" तो स्वत:ला कधी रागावू देत नाही. मि त्याला अजून रागाने बॅट आपटताना बघितले नाही जरी त्याला चुकीचे आउट दिले असले तरी सुद्धा. त्याने एक बाउल आईस क्रीम जास्त खाल्ले कि समजायचे कि तो रागात आहे किंवा टेन्शन मध्ये आहे." झहीर खान.

"बच्चे ! एक दिन तू बहुत बडा बनेगा. लेकिन वो टाईम पे तेरे पहिले कप्तान को मत भूलना." के. श्रीकांत.

" ग्रेग चापेल गांगुली के जैसे सचिन से भी छुटकारा पाना चाहते थे. लेकिन उनकी योजना विफल रही." दिलीप वेंगसरकर.

" तो नेहमी जिम ला जातो कधीच चुकवत नाही." एक टीम प्लेयर.

" तू अश्या चुकीच्या बॉलला का आउट होतोस ?" - अंजली तेंडूलकर जेव्हा सचिन ऑफ साईड चा फटका मारताना आउट व्हायचा.

"असे माझ्या बरोबरच का झाले मला अजून क्रिकेट खेळायचे आहे?" सचिन स्वत: आपल्या बायकोला म्हणाला जेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता आणि त्याला ऍडमिट केले होते.

अश्या ह्या ग्रेट माणसाबद्दल लिहायला बसलो तर पुढचा वाढदिवस येईल.
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार.

Read More

एका रात्रीची गोष्ट...

तो नेहेमीप्रमाणे कामावरून घरी येत होता. आजही पाय लडखडत होते. चाळीच्या कॉर्नर पर्यंत मित्र सोडायला आला होता. आज पण नाही नाही म्हणता जास्त घेतली होती. आता तोंडाचा वास आला कि बायकोची कटकट चालू होईन. पोरांची रडारड चालू होईल. वैताग आलाय ह्या गरिबीचा, ह्या कामाचा, ह्या दररोजच्या कटकटीचा. तेच सारे विसरायला हे पिणे चालू झाले आणि आता सुटता सुटत नाही आहे. बायको पण समजून घेत नाही आहे. तिला वाटतेय कि मजा मारायला पितोय. मी कामावरच्या बायकांबरोबर बोललो तरी तिला संशय येतोय. माझ्यावर विश्वासच नाही. साला मला कोण समजूनच घेत नाही आहे. वैताग आलाय ह्या जगण्याचा.

धडपडत, कशाबशा पायऱ्या चढत तो चाळीतील आपल्या घरापर्यंत आला. दरवाजा ठोठावला. आतून 'बाबा आले' 'बाबा आले' असा पोरांचा आवाज आला. बायकोने दरवाजा उघडला. दारूचा भपकारा तिच्या नाकाला झोंबला तसा तिचा पारा चढला. धावत आलेल्या छोट्या पोराला तिने तसाच डोळे वर करून मागच्या मागे पिटाळला. कंबरेवर हात ठेवून तिने रागाने नवऱ्याला विचारले, "आलात आज पण पिऊन? तुम्हाला तर काही सांगून समजतच नाही इथे पोरांना शाळेत फी भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही खुशाल आपले ढोसून येताहेत. बायकोचे काही ऐकायचे नाही असेच ठरवले आहे वाटते?"

मोठी मुलगी पुढे आली आणि आईला म्हणाली, "अगं आई त्यांना आत तर येउदे."
"तू गप् ग !आली मोठी मला शिकवायला"...आई कडाडली.
तशी पोरगी गप् जाऊन पुस्तकात डोके घालून बसली. 

तो आत आला तसा उंबरठ्याला अडखळून धडपडला. एवढी घेतली होती कि बायकोने कपाळाला हात मारून दोन शिव्या घातल्या. बायकोने आणि मुलीने तसाच खांद्याला धरून वर उठवला आणि आतल्या झोपायच्या खोलीत  नेऊन झोपवला. 

सकाळी डोळ्यावर सूर्याची किरणे आली तशी त्याला जाग आली. घड्याळात बघितले साडे आठ वाजून गेले होते. आज पण बायकोने उठवले  नाही. आज पण कामाला लेट होणार. परत सायेबाच्या शिव्या खाव्या लागणार. उठून बेड वर बसला. डोके अजून जड होते.सर्व गरगरत होते. आता बायकोची कटकट चालू झाली कि अजून डोके उठणार आहे. पण आज बायकोचा आवाज येत नव्हता  तो तसाच डोके पकडून उठला. तेवढ्यात बायको समोर आली. चक्क हातात लिंबू पाणी घेऊन आणि म्हणाली, "हे घ्या ! जरा डोके हलके वाटेल". 

च्यामायला मी स्वप्नात तर नाही ना ? बायकोचा आवाज एवढा मृदू कसा झाला? लग्नानंतर पहिले काही दिवसच हा आवाज ऐकायला मिळाला होता. स्वत:लाच चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली. पण जे डोळ्यासमोर होते ते खरे होते. हातात खरच लीम्बुपानी चा ग्लास होता. एका घोटात त्याने पिऊन टाकला आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.

डोके पुसत बाहेर आला तर बेड वर त्याचे ऑफिस ला जायचे कपडे काढून ठेवले होते. शूज पोलिश करून ठेवले होते. तेव्हढ्यात बायको आली तिने हातातला टॉवेल खेचून घेतला आणि म्हणाली तुम्ही बसा खुर्ची वर मी पुसते तुमचे केस. तो आश्चर्यचकित !!!! बसला खुर्चीवर. 

डोके पुसता पुसता बायको म्हणाली,"लवकर तयारी करून या. आज नाश्त्याला तुमच्यासाठी कांदा पोहे केले आहेत. ते खावून घ्या आणि डब्याला पण तुमच्या आवडीचीच भाजी केली आहे आणि संध्याकाळी पण लवकर घरी या" टॉवेल त्याच्या हातात देऊन ती स्वयंपाक घरात निघून गेली.

आत तर तो पूर्ण चक्रावून गेला. रात्री असे काय झाले तो ते आठवायचा प्रयत्न करू लागला. पण रात्री एवढी चढली होती कि काही आठवायलाच तयार नव्हते. एवढेच आठवले कि आपल्याला बायकोने आणि पोरीने उचलून आतल्या खोलीत उचलून आणले. तो पोरीकडे गेला आणि विचारले, "काय ग !! तुझ्या आई ला मध्येच काय झाले? एका रात्रीत अशी अचानक कशी बदलली?"

पोरगी म्हणाली, "बाबा ! काल आम्ही तुम्हाला बेड वर नेऊन टाकले. मी तुमचे शूज काढत होती आणि आई तुमचे ऑफिसचे कपडे काढत होती, तेव्हढ्यात तुम्ही ओरडला कि नको नको बाई ! माझे कपडे काढू नका. माझे लग्न झालेले आहे. माझी घरी एक बायको आहे. दोन मुले आहेत. प्लीज माझे कपडे काढू नका. प्लीज......"

तो काय समजायचे ते समजून गेला.

Read More

अण्णांसाठी पत्र

प्रिय अण्णा,

anna-hazare_040711101854_20110408060620_254x195
अण्णा हजारे लोकपाल साठी उपोषण करताना
अहो अण्णा ! हे काय करायला बसला आहेत तुम्ही....आतापर्यंत फक्त महाराष्ट्राची साफसफाई करत होता आता थेट दिल्लीत जाऊन देशाची साफसफाई करायला घेतली आहेत तुम्ही. अहो कसे काय जमणार तुम्हाला ? अशाने भ्रष्टाचार चा राक्षस संपणार आहे का ? अहो भ्रष्टाचार तर आमच्या रक्ता-रक्तात भरला आहे. असा एक दिवस जात नाही कि आमच्या देशात भ्रष्टाचार उघडकीस आला नाही. तुम्ही उपोषण करा नाहीतर दांडी यात्रा करा, आमच्या भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी बाबूंना काही फरक नाही पडत. अहो ! तुम्ही भुकेने मेलात तरी त्यांना काही फरक नाही पडणार. अहो आता येणारी नवी जनरेशन च्या अंगातहि त्यांच्या बापाने केलेले भ्रष्टाचाराचे जीन्स आपोआपच येताहेत. पुढे जाऊन हीच जनरेशन भ्रष्टाचाराचे रेकोर्ड करणार आहे.

अहो कुठले कुठले डीपार्टमेंट तुम्ही साफ करणार? असे कुठले डीपार्टमेंट राहिले आहे ज्यात भ्रष्टाचार होत नाही? समाजाशी जास्त संबधित असलेले पोलीस खाते, फायर ब्रिगेड, गृह खाते, म्युन्सिपालीटी सर्व भ्रष्टाचाराने पोखरली आहेत.तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे त्याला नवीन जनरेशन चा सपोर्ट मिळेल ह्यात काही शंकाच नाही पण ते सर्व आपापले काम धंदा सोडून तुमच्या बरोबर दिल्लीला थोडीच येणार आणि तुमच्या बरोबर उपोषणाला थोडीच बसणार आहेत?

अहो अण्णा पहिले म्हणजे तुमचे टायमिंग जरा चुकले. वर्ल्डकप चा जोश नुकताच कुठे शरीरात भिनत होता आणि परत आयपीएल चालू होतेय. क्रिकेट ह्या देशाचा धर्म, जात, पात, श्वास आहे. अहो आयपीएल चे बिगुल वाजले कि तुम्हाला हे सर्व लोक विसरून जातील. फेसबुक, ओर्कुट आणि कट्ट्यावर फक्त धोनी, युवराज, सचिनच्याच चर्चा होतील. कोण हे अण्णा ? छोड मॅच देख असे बोलायला कमी नाही करणार.

तुम्हाला मध्ये फक्त  ५/६ दिवसच होते. तुम्ही आता चुकीच्या वेळेला उपोषणाला बसला आहात. तुम्हाला वाटले असेल कि जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात तुम्हाला निकाल भेटेल?  अहो तुम्ही कदाचित विसरला असाल कि ह्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बॉम्बस्फोट होऊन मृत्युमुखी पडतो आणि त्याची केस १५ वर्षे चालते तिथे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा? राष्ट्रपती नंतर पंतप्रधान ह्या देशातले दुसरे महत्वाचे पद. हे पद आपल्या भारताचे पूर्ण जगात प्रतिनिधित्व करते. अश्या पंतप्रधानाच्या मृत्यूची केस कोर्टात १५ वर्षे चालते मग तुम्ही विचार करा कि आपले कायदा आणि गृह खाते किती सक्षम आहे ते.  तरी नशीब त्या श्रीलंकेने त्या प्रभाकरन ला ठार मारले आणि राजीव गांधीची केस बंद झाली नाहीतर ती अजून चालूच राहिली असती.

अहो तुम्ही ज्या लोकपाल साठी हट्ट धरलाय त्यावर निवडून येणारी पण माणसेच असतील हो. उद्या त्यानीच भ्रष्टाचार केला तर तुम्ही परत उपोषणाला बसणार का ? तुम्ही जो हट्ट धरलाय तो योग्यच आहे ह्या लोकपाल समिती मध्ये अर्धी सरकारची आणि अर्धी जनतेची माणसे हवीत आणि ते सुद्धा उच्च क्षिक्षितच हवी ज्यांना समाजाची आणि बऱ्या वाईटाची चांगली जाण असावी. एका बाबतीत तुम्हाला मानले कि तुम्ही दोन बॉल मध्येच  शरद रावांची विकेट काढली. त्यांच्या सारख्या मातब्बर राजकारण्याची विकेट काढली त्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात.

अहो भ्रष्टाचार आमच्या जन्मापासून ते स्मशानापर्यंत सोबत आहे. जन्माला आल्यावर पहिले नर्स/ आया च्या हाती पैसे टेकवा नाहीतर तुमची आणि तुमची बाळाची ते काळजी बरोबर घेणार नाही, जन्माची नोंद करायची असेल आणि जन्माचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याला लाच द्यावी लागणार, पुढे बाळ मोठा झाला त्याला शाळेत घालायचे आहे तर शाळेच्या ऐपती प्रमाणे (तुमच्या ऐपती प्रमाणे नाही ) तुम्हाला डोनेशन द्यावे लागणार. जेवढी शाळा मोठी तेवढे डोनेशन जास्त. पुढे कॉलेज ला डोनेशन, त्याला इंजिनिअरिंग ला जायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल त्या प्रमाणे डोनेशन रूपी लाच द्यावी लागते, पुढे मोटार सायकल/गाडी  घ्यायची असेल तर लायसन्स काढायला लाच द्यायची, गाडीचे रजिस्ट्रेशन करायला लाच द्यायची, पुढे तर जसे जसे सिग्नल तोडेल, कायदे मोडेल तस तसे तोच लाच द्यायला शिकतो. मग नोकरी लागायला लाच, त्यात जर सरकारी नोकरी असेल तर विचारायलाच नको. लाच देणारे हात कधी घ्यायला चालू होतात ते त्याचे बिचाऱ्यालाच समजत नाही,घर घ्यायचे असेल तर लाच द्यावी लागते, पुढे रिटायर्ड झाल्यावर आपल्याच हक्काचे पैसे परत मिळायला लाच द्यावी लागते, हॉस्पिटल मध्ये चांगला बेड मिळण्यासाठी लाच द्यावी लागते, मरताना बॉडी आपल्याच नातेवाईकांच्या हातात मिळायला लाच द्यावी लागते, मेल्यावर स्मशानात लवकर नंबर लागावा ह्या साठी लाच, मेल्यावर जाळायला सुद्धा चिरीमिरी द्यावी लागते, मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीहि लाच दिल्याशिवाय मिळत नाही. पण अण्णा तुम्ही लढा!! आम्ही सुधारलो नाही तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कधी न कधी तुम्ही जिंकलाच.

आता आम्हाला तुमच्या या उपक्रमाला साथ द्यायला दिल्लीला वगैरे यायला येता येणार नाही पण  आम्ही आमच्या परीने फेसबुक, ओर्कुट वगैरे साईट वर किंवा ह्या लिंकवर क्लिक ( http://www.avaaz.org/en/stand_with_anna_hazare_fb/?copy) करून तुम्हाला साथ देऊ. चक्क तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा पाठींबा दिला आहे तुम्ही घाबरू नका. भले काही नेते तुमच्या नावाने शंख करूदे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिंकलाच असे समजा. आम्ही तुमच्या नावाने प्रिंट केलेल्या गांधी टोप्या घालू, एकमेकांना लिंक फोरवर्ड करून सबस्क्रायीब करायला सांगू, तुमच्या समर्थनासाठी एक दिवसाचा उपवास करू, जमले तर आयपीएल बघायचे पण टाळू, पण तुम्ही लढा.

अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!!!

तुमचाच पाठीराखा
आशिष सावंत.

Read More

बॉम्बे नाही रे....मुंबई !!!

च्यायला !!! कधी कधी डोकेच फिरते..जेव्हा कोणी सारखे सारखे बॉम्बे बॉम्बे करत बसले कि. माझ्या समोर जेवढे जण बॉम्बे बोलतात त्या सर्वाना मी टोकतो आणि मुंबई बोलायला सांगतो. काही जण त्यावरहि वाद घालत बसतात. जास्त डोक्यात शिरला की मग ओरडून बोलायचे मग साले लाईनवर येतात.  हे लोक साले आपल्या भावनांचा आदर का नाही ठेवत. किती वेळा एकच गोष्ट ओरडून सांगायची. 

mumbaiऑफिस मध्ये पण साऊथ इंडिअन बॉस असेल तर तो मुद्दाम बॉम्बे बोलणार. एकदा समजावून सांगितले तरी मुद्धाम परत बोलणार आणि बॉम्बे बोलला कि हळूच डोळ्याच्या एका कोपऱ्यातून आपल्याकडे बघणार. माझ्या ऑफिस मध्ये तर देशातल्या सर्व प्रांतातून आलेले लोक आहेत. कोलकाता वाले बॅंगोली लोक कोलकाता ला कलकत्ता बोलले कि टोकतात. पण बॉम्बे चे मुंबई बोलायला सांगितले कि विसरतात. निदान ते लोक आपली चूक सुधारून परत मुंबई तरी बोलतात. पण साऊथ वाले जरा हि ऐकत नाही. ते कशाला, काही मराठी लोक जेव्हा बिजिनेसची ऑफर घेऊन माझ्या ऑफिस मध्ये येतात तेव्हा बॉसशी इंग्लिशमध्ये बोलताना जाणून बुजून  मुंबईच्या ऐवजी बॉम्बे बोलतात. का ?? तर स्टेटस दाखवायला. तेच बॉस च्या केबिन मधून बाहेर आले कि माझ्याशी बोलताना मुंबई बोलतात. साल्यांना एवढी कसली लाज आली आहे? आपल्या भाषेत बोलायला आपल्याच राज्यात कसली आली आहे भीती ? अरे तुमच्या सारख्या लोकांची इथे नाही चालणार तर कुठे चालणार? तुमच्यामध्ये तर दम नाही आहे कि दुसऱ्या राज्यात जाऊन मराठी बोलायची, निदान आपल्या राज्यात तरी न घाबरता बोला. ह्यांच्या सारख्या मुठभर लोकांमुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस मागे पडतो आणि जे पुढे जातात त्यांचे हसे तरी होते नाही तर राज ठाकरे तरी होतो. फिरवताहेत बिचाऱ्याला महाराष्ट्रभर ठिकठिकाणी केसेस टाकून.


कलकत्त्याचे जेव्हा कोलकाता केले होते तेव्हा त्याच दरम्यान मी माझ्या कोलकाता ऑफिस मध्ये एका रे आडनावाच्या माणसाला फोन केला होता. तेव्हा माझ्या तोंडून बोलताना कलकत्ता निघाले तेव्हा लगेच त्याने मला सांगितले कि आता कोलकाता नाव केलेले आहे तेव्हा तेच नाव घे. मग लगेच त्याच्या बोलण्याचा आदर ठेवून लगेच दुरुस्ती केली आणि जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर बोलणे झाले तेव्हा तेव्हा आवर्जून कोलकाता बोललो. त्याने सुद्धा माझ्याशी ह्या गोष्टीवरून चांगली दोस्ती केली. 

तीच गोष्ट चेन्नई च्या बाबतीत होते तेथे चुकूनहि लोक मद्रास बोलत नाही आणि दुसरा बोलला तर लगेच त्याला चूक दुरुस्त करायला लावतात. मराठी लोकांमध्ये अशी अस्मिता केव्हा जागणार? कोचीन चे कोची केले गेले, तंजोर चे तंजावर केले गेले, वाईझाग चे विशाखापट्टनाम केले गेले. तेथील कोणीही लोक जुने नाव घेत नाही आणि घेऊ देत नाही. त्यांच्या राज्यात नाहीच नाही पण आपल्या राज्यात हि नाही घेऊ देत. बघा अनुभव घ्या कधी !!!आणि आपण साले एक बॉम्बे चे मुंबई बोलू शकत नाही ???

साऊथ लोकांना अस्मिता शिकवावी लागत नाही किंवा भाषेच्या अस्मितेचा आव आणावा लागत नाही. आम्ही आपले 'मराठी अस्मिता', 'मराठी बाणा' असेल शब्द वापरून ब्लॉग लिहिणार, साईट बनवणार, मोठ्या मोठ्या गप्पा मारणार, शिवरायांच्या फोटो सोबत 'मी मराठी' मराठी बाणा वगैरे शब्द लिहून टी शर्ट घालणार, छान छान मराठी वोलपेपर डेस्कटोप वर लावणार पण बोलताना बॉम्बेच बोलणार. आम्ही मराठी मोडणार पण वाकणार नाही.  अरे पण आपण आपल्याच घरात घाण करतोय हे का दिसत नाही ह्यांना? अशा काही लोकांमुळेच परप्रांतीयांचे चालते आणि ते आपल्या डोक्यावर येऊन पोळ्या थापाताहेत.

मध्ये करण जोहर च्या एका सिनेमा मध्ये बॉम्बे वापरले गेले होते. राज साहेबांनी आवाज दिल्यावर करण जोहर ने येऊन माफी मागितली होती. त्यावर राज साहेबांवर किती टीका झाली होती. समांतर सरकार चालवायचा प्रयत्न करताहेत, काही मराठे राज्यकर्ते तर म्हणत होते, करण जोहर ने जर सुरक्षा मागितली असती तर आम्ही दिली असती. आता काय बोलणार ह्या षंढ राजकारण्यांना ? जेव्हा मराठीचा, महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा मुद्दा येतो तेव्हा तरी आपले मतभेद विसरून सर्वानी एकत्र यायला हवे ना ?

आता तरी सुधरा रे बाबांनो !!! \
मराठी असल्याचा नुसता गर्व नकोय तर माज असला पाहिजे.


आतापर्यंत आपल्या देशात ह्या शहरांची नावे बदलली गेली आहेत.
मुंबई (आधी बॉम्बे, नवीन नाव १९९५ पासून)
चेन्नई (आधी मद्रास, नवीन नाव १९९६ पासून)
कोलकाता (आधी कलकत्ता, नवीन नाव २००१ पासून)
विजयवाडा (आधी बेजवाडा)
विशाखापट्टनम (आधी वाल्तर, त्याही आधी विझाग)
कडपा (आधी कडप्पाह, नवीन नाव २००५ पासून)
शिमला (आधी सिमला )
कानपूर (आधी कावन्पोर, नविन नाव १९४८)
थीरुवनांतपुरम (आधी त्रिवेंद्रम, नवीन नाव १९९१)
पुणे (आधी पुना)
कोची (आधी कोचीन, नवीन नाव १९९६)
सागर (आधी सौगोर)
जबलपूर (आधी जब्बलपोर )
नर्मदा (आधी नरबुद्दा)
पुडुचेरी (आधी पोन्दिचेर्री, नवीन नाव २००६)
इंदोर (आधी इंदूर)
कोझिकोडे (आधी कालिकत )
उदगमंडलाम (आधी ओतकामुंद )
तिरुचिरापल्ली (आधी त्रिचीनोपोली)
तंजावर (आधी तंजोर)
जास्त माहिती ह्या लिंकवर विकिपेडिया 

Read More

India won World Cup 2011

001
विश्वचषक २०११ भारताने जिंकला/ India won World Cup 2011

ओरडून ओरडून घसा बसायला लागलाय. मोठ्या ड्रामेबाजी नंतर आपण शेवटी २०११ चा वर्ल्ड्कप जिंकलोय. अजून विश्वास नाही बसत आहे. खरच आपण वर्ल्ड कप जिंकलोय!!!!!  आमच्या चौकात मोठी स्क्रीन लावली होती. शेवटच्या दोन ओवर तेथे जाऊन बघितल्या. सर्व लोकांबरोबर जाऊन वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद घेतला. भारताला जिंकायला ४ धावा पाहिजे होत्या आणि धोनीने उचलून उंच षटकार ठोकला आणि त्याच क्षणी तो षटकार ऐतिहासिक झाला. त्या षटकारने भारताच्या १.२१ करोड हून जास्त लोकांना हवा असलेला वर्ल्ड कप जिंकून दिला. पुढील कितीतरी वर्षे हा षटकार दाखवला जाईल. 

सचिन, सेहवाग आउट झाल्यानंतर सामन्यातला दमच निघून गेला होता असे वाटले. मन उदास झाले होते. हा वर्ल्डकप तरी गेला नाही पाहिजे नंतर अशी टीम बनेल नाही बनेल, सचिन त्यात असेल नाही असेल, खूप काही गोष्टीचे मनात काहूर उठले होते. मग विचार केला, अरे आपल्याकडे वर्ल्ड ची बेस्ट बॅटिंग लाइनअप आहे, का नाही आपण जिंकणार हा वर्ल्डकप? मित्राने फटाके आणले होते त्याला आशा नव्हती खात्री होती...जिंकूच!!!. जिंकलो नाही तर काय होईल? पण मनात एक सुप्त आवाज सांगत होता कि हा वर्ल्ड कप जिंकूच. सचिन साठी, देशा साठी, सर्वांसाठी.

आणि धोनी ब्रिगेड ने चमत्कार केला. गंभीर आणि कोहली ने मलिंगाने उठवलेले तुफान थोपवून धरले. खेळपट्टीवर जम बसवला. कोहली आउट झाला आणि काळजाचा ठोका चुकला. मित्र बोलले आता युवराज येईल पण मला वाटत होते धोनी आला पाहिजे. गेले क्रित्येक सामने तो शेवटी येऊन दबावाखाली खेळतो आणि काहीच रन करत नाही. 

आणि माझ्या मनासारखेच झाले धोनीच मैदानावर आला. मी मित्रांना बोललो आजचा दिवस धोनीचा आहे, 'वो देखना अच्छा खेलेगा.' गंभीर आणि धोनीने चांगली भागीदारी केली. श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजाना योग्य ती वागणूक देत सर्व ओवर खेळून काढल्या. गंभीर ने घाई केली, नाही तर आयुष्यातले सर्वात मेमोरेबल शतक ठरले असते पण साल्याने ऐन वेळेला घाई केली आणि विकेट टाकून बसला. 

युवराजचे आगमन झाले...पॉवरप्ले चालू झाला....बॉल रन ची स्पर्धा चालली होती....तू जास्त कि मी जास्त.... त्यात मलिंगाने पॉवरप्ले मधील पहिल्या ओवर चे पहिले चार बॉल निर्धाव टाकले. टेंशन वाढत होते पण युवराज वर भरवसा होता तो टेन्शन घेणाऱ्या मधला नव्हता त्याला फक्त एक किंवा दोन वाईट बॉल ची आवशक्यता होती आणि तेच झाले पुढच्याच कुलसेकराच्या ओवर मध्ये ११ धावा काढल्या. आम्ही मित्र फटाके घेऊन खाली उतरलो आणि रस्त्यावर जाऊन नाचायला लागलो.

पुढची ओवर मलिंगाची... त्याला पण योग्य ती वागणूक देत ११ रन चोपून काढले....खर तर त्याच्याच ओवरला सामना संपला पाहिजे होता.फुकटचा भाव खाल्ला साल्याने !!!

01
धोनिने विश्वचषक जिंकण्यासाठी ऐतिहासिक सिक्स मारला
Dhoni hits historical Six to win the worldcup
४८ वि ओवर चालू झाली.... ५ धावा पाहिजे होत्या विश्वचषक जिंकायला. पहिला बॉल....नुवान कुलशेखराचा..... युवराज सिंगला एक धाव घेतली आणि धोनी कडे स्ट्राईक आला..... ४ धावची गरज ....आम्ही ओरडलो फोर मार....फोर मार....त्यानेहि ऐकले वाटते असा खणखणीत स्ट्रोक मारला.... बॉल उंच उडाला......स्टेडियम मध्ये गेला....अंपायरने दोन्ही हात वर केले आणि.....सिक्स ....सहा धावा.....आम्ही ओरडायला लागलो....नाचायला लागलो.....वेडे झालो होतो.....आम्ही वर्ल्ड कप जिंकला .....ड्रेसिंग रूम मध्ये बाकीचे खेळाडू नाचायला लागले होते.... आकाशात रॉकेट फुटू लागले....लवंग्या माळा लागल्या....आम्ही आणलेले  फटाके काढले ....रस्त्यावर मोठी लवंगी माळ पसरली....अगरबत्ती लावली आणि पेटवून दिली.....सुटली बॉम्ब लावले ....एका मागून एक पेटवले....आनंदाने नाचत होतो...

उफ्फ !!! अंगावर काटे मारत होते.....आपण विश्वचषक जिंकला...विश्वासच नव्हता बसत.....युवराज स्क्रीन वर रडत होता....सचिन आला आणि त्याला मिठी मारली सर्व नाचायला लागले आणि पण धमाल नाचलो एकमेकांना मिठ्या मारल्या.
04
अम्पायारने सिक्स चा इशारा केला/ Umpire declared it as SIX
15

विनिंग स्कोर बोर्ड
/ winning score board



13
सचिन सर्वाना हात दाखवताना जेव्हा टीम ने त्याला खांद्यावर उचलले होते
 Sachin waves the crowd when lifted by Indian team
धोनी ब्रिगेड ने सचिन ला खांद्यावर घेऊन पूर्ण स्टेडियम फिरवले. त्याला ह्याच्यापेक्षा चांगली भेट नक्कीच काही नसेल...मुंबईच्या ग्राउंड वर मुंबईच्या लोकांसमोर त्याची खांद्यावरून मिरवणूक काढली....ह्याच मुंबईच्या लोकानी त्याला टेनिस एल्बो झाला असताना पहिल्यांदा बु!!!!! केले होते...अपमानित केले होते....त्याच लोकांसमोर आज त्याला मानाने फिरवले होते......घरी आलो आणि वर्ल्डकप घेण्याचा सोहळा बघितला...मन तृप्त झाले...उद्या येणाऱ्या जनरेशनला ह्या आठवणी सांगत बसू....कितीतरी दिवस हा नशा आता उतरवणार नाही...साले जे जे लोक बोलले होते ...सचिन देशासाठी एवढे खेळला पण एक वर्ल्ड कप नाही देऊ शकला...घ्या साल्यांनो आमच्या देवाला बोलता ना ???? घ्या !!!! आता वर्ल्ड कप घ्या !!!!



मटा वर आलेले स्कोर कार्ड आणि पूर्ण कॉमेंट्री सेव करून ठेवणार आहे. आजच्या आठवणी लक्षात राहिल्या पाहिजे म्हणून आजच ब्लॉग लिहायचे ठरवले आणि त्या शिवाय झोपायचे नाही..कितीही वाजले तरी. रात्रीचे / पहाटेचे ४ वाजत आले आहे. 


जिंकल्यावर एक एसेमेस आला....अनहोनी को होनी कर दे...होनी को अनहोनी... एक जगह पे जमा हो तीनो ....रजनी, गजनी अँड धोनी. (रजनिकांत दिसल्यावरच नक्की झाले होते...श्रीलंका हरणार ते)

देवाचे शत शत आभार....आमच्या देवाला ...सचिनला वर्ल्ड कप दिला....

02
युवी लास्ट बॉल नंतर चिअर अप करताना/ Yuvi chearing up on victory


07
युवी लास्ट बॉल नंतर चिअर अप करताना/ Yuvi chearing up on victory


06_3
युवराजने आपल्या भावना मोकळ्या केल्या / Yuvraj couldnot control his emotions


06_1
युवराजने आपल्या भावना मोकळ्या केल्या / Yuvraj couldnot control his emotions


06
टीम जल्लोष करताना / Team Celebrating


05
विनिंग सिक्स मारल्यावर युवराज ने धोनीला आलिंगन दिले / Yuvraj hug Dhoni on winning shot
04

03

12
यशस्वी टीमचा प्रशिक्षक / Man behind sucess
11_1
युवी आणि तेंडूलकर एकमेकांना मिठ्या मारताना /Yuvi and Tendulkar hugs each other


11
युवी आणि तेंडूलकर एकमेकांना मिठ्या मारताना /Yuvi and Tendulkar hugs each other


10
कंट्रोल युवी / Control Yuvraj 


09
कंट्रोल युवी / Control Yuvraj 


08
Celebration time


14
ग्रेट चाम्पिअन / Great Champions


20
Sachin for you only /सचिन फक्त तुझ्यासाठी 


19
The God


18
Captions knock


17
Man of the tournament worldcup 2011


16
Team India 


23
सचिन त्याच्या मुलांसह  / Sachin with his daughter and son


22
Men in Blue


21
Champions 2011


30
Caption you deserve this !!!


29
We have won the world cup


28
yaaaaaaaaa !!!!!!!


27
yyyyyooooooooo!!!!!!


26

25

24
Indian future


34
with family

 &

last
  The God of Cricket / क्रिकेटचा देव 


(सर्व फोटो नेट, गेट्टी इमेजेस, एनडीटीवी स्पोर्ट वरून साभार/ all images with thanks from net, Getty images,NDTV Sports)

Read More

भारत पाकिस्तान सेमी फायनल

भारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून राहाव्या म्हणून विचार केला लिहून काढाव्या. आता लहान असलेली जनरेशन किंवा पुढे येणारी जनरेशन नी विचारले कि भारत पाक ची सेमी फायनल कशी होती तर सांगता आली पाहिजे म्हणून लिहून ठेवावीशी वाटतेय. काय भरवसा परत पाक भारत समोर कधी येईल आणि काही दिवसांनी तर तो देशाच्या नकाशावरूनच गायब होण्याची भीती वाटते.

सामना चालू व्हायच्या आधीच २ दिवसापासुन सुट्टी मिळेल कि नाही ह्याची चर्चा चालू होती तेवढ्यात पाक ने त्यांच्या इथे राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ऐकून आपल्याकडे का नाही झाली ह्याची गरमागरम चर्चा चालू होती. ऑफिस मध्ये काही मित्रांनी सुट्टी टाकली पण, आणि साहेब लोकांनी इमानदारीत मान्य पण केली. माझा एक मित्र म्हणाला कि तू सुट्टी घेऊ नको करून तू सुट्टी घेतली कि आपण हरतो. (आमच्या ऑफिस मध्ये इंटरनेट सर्वाना दिलेले नाही आहे आमच्या ग्रेड ला नाहीच नाही. सुदैवाने एकदा मोठा बॉस खुश असताना त्याच्या कडून परवानगी घेऊन ते चालू केले होते. त्यामुळे मी मटा च्या साईट वर स्कोर बघून सर्व मित्र मैत्रिणींना फटाफट फोरवर्ड करत असतो. अगदीच क्रुशिअल सामना असेल तर रेडीओ वर कॉमेंट्री ऐकत मेल वर लिहून पाठवतो. आमच्या ऑफिस मध्ये क्रिकेट संदर्भातल्या सर्व साईट सर्वर पातळीवरच बंद करून ठेवल्या आहेत. नशिबाने मटा चालू असते म्हणून स्कोर मिळतो.)  तर गेल्या काही महत्वाचे सामन्याची मी रनिंग कॉमेंट्री करून सर्वाना अपडेट देत असतो. काही सामन्याच्या वेळेला माझे महत्वाचे काम असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि त्यादिवशी सामना हरलो होतो. असे दोन तीन वेळा झाले ते सुद्धा त्याच मित्राने दर्शविले. तेव्हापासून काही महत्वाचे सामने असेल तर मी सुट्टी घेतच नाही, भले मला बघायला मिळाले नाही तरी चालेल. अर्थात सुट्टी जर ऑफिशिअल असेल तर तो अपवाद असतोच. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप चे सामने बघायला तरी मिळाले.

तर मित्राने आठवण करून दिल्यामुळे मी सुट्टी टाकायचा विचारच रद्द केला आणि ऑफिस मध्येच राहायचे ठरवले. ऑफिस मध्ये टीवी चा बंदोबस्त होत होता त्यामुळे काही काळजी नव्हती. सकाळपासून सामन्याचे वेध लागले होते. बस, ट्रेन सगळीकडे तीच चर्चा चालू होती. भारतात एका अभूतपूर्व बंदला सुरुवात होणार होती. असा बंद जो कुठल्याही राजकीय पार्टीने पुकारला नव्हता आणि तरी त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री होती, मोठमोठ्या खाजगी ऑफिसेस नी आधीच सुट्टी जाहीर केली होती. काही ऑफिसेस नी अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती. ज्यांना पूर्ण दिवस होते ते मनातल्या मनात शिव्या घालत कामावर येणार होते. रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने हे रस्त्यावर काढणार नव्हते. सर्व राजकीय नेते रस्त्यावर न उतरता घरात टीवी समोर बसून राहणार होते. मॉल, मल्टीप्लेक्स सगळी रिकामी होणार होती. जिथे टीवी किंवा स्क्रीन चा बंदोबस्त केला होता तिथेच फक्त गर्दी दिसणार होती. रस्ते दोन नंतर ओस पडणार होते, सदानकदा भरलेल्या मुंबईच्या लोकल रिकाम्याच धावणार होत्या. एका अभूतपूर्व बंद ला सुरुवात झाली होती.

ऑफिस मध्ये पोचल्यावर एक सुतकी वातावरण होते. सुट्टी दिली नाही ह्याचे सुतक होते. जसे जसे घड्याळाचे काटे सरकु लागले तस तसे हृदयाच्या धडधडी वाढू लागल्या. एक वाजायच्या आताच जेवणं उरकून घेतली. मटा ची साईट चालू केली आणि बसलो. धोनीने अश्विन ला काढून नेहरा ला घेतले हि बातमी ऐकूनच डोके फिरले म्हटले ह्या माणसाला झालेय काय? सामना जर हातातून गेला तर नक्कीच हा शिव्या खाणार. पण बहुतेक नशीब त्याच्या बाजूने होते. टॉस जिंकून भारताने फलंदाजी घेतली ऐकून आनंद झाला चला सचिन ला सेन्चुरी करायला संधी मिळेल.
india_vs_pakistan_images

पहिले काही ओवर रेडीओ वर ऐकून तर अंगावर काटेच मारायला लागले म्हटले सेहवाग ची अशी फलंदाजी बघायला घरीच राहायला हवे होते. पण काय करणार बॉस समोरच बसून होता स्वत: पण टीवी बघायला जात नव्हता आणि त्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. शेवटी मनाचा  हिय्या करून आम्ही दोघा तिघांनी टीवी बघायला जाऊ का विचारले आणि परवानगी मिळाली. तसाच धावत जेवायच्या रूम मध्ये जिथे टीवी लावला होता तेथे पळालो. तेथले वातावरण बघून अंगावर सर्रकन काटा मारून गेला, सेहवागने नुकतेच ५ चौकार मारले होते आणि सर्वच नाचत होते. आम्ही पण जाऊन सेलेब्रेशन करायला सुरुवात केली. पुढच्याच ओवर मध्ये सेहवाग ने उपर कट मारला आणि आम्ही एवढा गोंधळ घातला कि विचारायलाच नको,. प्रत्येक बॉलला गोंधळ चालू होता आणि अचानक सेहवाग पायचीत झाला आणि शांतता पसरली. सेहवाग ने रेव्ह्यू घेतला पण त्यात पण आउटच झाला. पुढची सर्व भिस्त आणि सचिन वर राहिली. पण पीच ला चांगला टर्न मिळत होता पाहिजे तसे शॉट बसत नव्हते.

current-pakistan-india-semi-final-photosआणि सामान्यातले दोन महत्वाचे बॉल ११ व्या षटकात टाकले गेले. अजमल च्या गोलंदाजी वर सचिन ला पायचीत दिले गेले आणि सर्व पाकड्यांनी स्टेडियम वर गोंधळ घालायला सुरुवात केली. पाक मध्ये तर नक्कीच फटाके फोडले गेले असतील. सचिन गंभीर कडे आला आणि त्याच्याशी चर्चा केली रिव्यू घ्यायचा कि नाही करण सेहवाग चा रिव्ह्यु फुकट गेला होता. शेवटी सचिनने रिव्ह्यू मागितला आणि स्क्रीन वर दिसायला लागले कि सचिन आउट नाही आहे मग जो भारतीयांनी गोंधळ घातला त्यामध्ये पाकचा आवाज कुठल्या कुठे दाबून गेला. सर्व शांत होत नाही तोपर्यंत त्याच धावसंख्येवर आणि अगदी अजमलच्या पुढच्याच चेंडूवर सचिन थोडा पुढे सरसावला आणि यष्टीरक्षक कामरान अकमलने बेल्स उडविल्या,परत टीवी अंपायर कडे निर्णयासाठी गेला. पण सचिनचा पाय त्याआधी क्रीझमध्ये पोहोचला होता आणि अशाने जल्लोषाला डबल उधान आले. अगदी नाचून, बिचून बोंबा मारत आम्ही गोधळ घातला तेसुद्धा काही सिनिअर बॉस लोक समोर असताना. त्यांनी सुद्धा अगदी मनापासून दाद दिली.

नशीब अंपायर रिव्ह्यू सिस्टीम चालू केली नाहीतर सचिन अशा बाबतीत खूप अनलकी असतो. आउट नसताना त्याला आउट द्यायची अंपायर लोकांना खूप आवड असते साले मोठ्या फुशारकीने सांगत असतील कि मी सचिन ला आउट दिले आहे.  पण कालचा दिवस सचिन चा होता एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा त्याला जीवदान भेटले. काल खरच देवच मैदानात फिरत असावा.  जसे ब्रह्मा वर संकट आले कि विष्णू धावत येतो, विष्णू वर आले कि शिवा धावून येतो तसेच क्रिकेटच्या ह्या देवाला सुरक्षा कवच घालून एखादा देवच मैदानावर फिरत असणार. म्हणून तर साधे साधे झेल पाकड्यांच्या हातून सुटत होते.

7829821सेहवाग गेल्यावर भारतीय फलंदाजी पुढे बहरलीच नाही. युवराज तर भोपळा न फोडता परतला होता. गंभीर, कोहली, युवराज, धोनी थोड्या थोड्या वेळाने परतले. पुढे रैनाने चिवटपणे मैदानावर उभा राहून स्कोर २६० वर नेला. घरी यायला बस मध्ये बसलो रस्त्यावर काही मोजके वाहने सोडले तर कोणीही नव्हते. दररोज  कमीतकमी १ ते दीड तास लागतो तिथे काल फक्त ३५ मिनिटात घरी पोचलो. पूर्ण हायवे रिकामा....सातच्या आत घरात. नुकतीच पहिली ओवर टाकून झाली होती. मग टीवी समोर बसून राहिलो ते ४० ओवर संपे पर्यंत उठलोच नाही. नेहरा, हरभजन आणि मुनाफ ची चांगली गोलंदाजी आणि रैना, कोहली ची चांगली फिल्डिंग बघून आनंद झाला. सचिनला मैदान वर बघताना छान वाटत होते. एवढी वर्षे झाली तरी अजून नवीन खेळाडू असल्याप्रमाणे प्रत्येक बॉलवर चांगली फिल्डिंग करतोय, बॉलरला येऊन टिप्स देतोय, कोणाकडून फिल्डिंग चुकली तर हाताच्या खुणा करून सांगतोय. पाक समोर खेळताना ह्या पठ्ठ्याला काय होते काय माहिती आपले जे काही खास शस्त्र, अस्त्र असतील ती सर्व काढून पाकी खेळाडूंवर तुटून पडतो. ह्या माणसाची भूक कधी थांबणार ? देव करो ह्याचा फिटनेस असाच राहो आणि हा अशा हजारो सामने खेळो.

7829812सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काही राज्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठे मोठे स्क्रीन लावले होते. आमच्या नाक्यावर सुद्धा अशी स्क्रीन लागली होती आणि तिथून मोठा गोंधळ ऐकायला येत होता म्हणून कपडे करून खाली जाऊन उभा राहिलो रस्त्यावर हि गर्दी पसरली होती. मी पण त्या गर्दीचा एक भाग होऊन गेलो. मित्र एकमेकांना फोन करून बोलवत होते, अरे !घरात काय बघत बसलाय येथे रस्त्यावर ये...काय धमाल येतेय बघ. आता प्रत्येक डॉट बॉल वर आनंद साजरा होत होता. गर्दी मध्ये एक माणूस होता, कोण होता ते दिसला नाही पण आपल्या फाटक्या आवाजात बॉल टाकायच्या आधी एका विचित्र टोन मध्ये 'आता आउट', 'आता आउट' असे ओरडायचा आणि नेमकी त्या वेळेला विकेट पडायची आणि सर्व लोक गोंधळ घालायचे. मला शेवट पर्यंत त्याचा चेहरा दिसला नाही. पण मजा येत होती तो जेव्हा बोलायचं तेव्हा विकेट पडायची जणू काय ह्याला स्वप्नात दिसत होते. तो पण साला पठ्ठ्या प्रत्येक बॉलला बोलायचं नाही. पब्लिक ने सांगितले तरी नाही बोलायचा, जेव्हा त्याच्या मनाला येईल तेव्हाच बोलायचा आणि विकेट काढायचा.

78299097829839खरच असे सामने एकटे बघण्याला काहीच मजा नसते. शेवटी सामना जिंकल्यावर लोकांनी खुर्च्या घेऊन नाचायला सुरुवात केली, फटाक्यांच्या माळा लागल्या, आकाशात रॉकेट सोडली गेली रस्त्यावर दिवाळी साजरी व्हायला सुरुवात झाली. भारत फायनलला गेला ह्याचा आनंद नव्हता तर पाकला चिरडले ह्याचा आनंद सगळ्यात जास्त होता. आईस्क्रीम ची दुकाने, वाईन शॉप वर थोड्याच वेळात गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पाकला चिरडण्यात आमच्या सचिनचाच मोठा वाटा होता आणि त्याने हि सांगितले कि पाक विरुद्ध खेळलेले सर्व सामने आणि मिळवलेले विजय हे संस्मरणीय आहेत. धन्यवाद सचिन तुझ्यामुळे आमच्यासाठीहि काही संस्मरणीय आठवणी आहेत.

Read More

हृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल?

Dr. Devi Shetty.
गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाशिवरात्रीच्या आधी माझ्या चुलत काकांना आला,एका मित्राच्या आजीला आला, दुसरे एक मोठे काकांना वेळेत उपचार झाल्यामुळे त्रास झाला नाही. काल एका मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आताच त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन बघून आलो. सर्व जवळपास ६० वयाच्या पुढचेच आहेत. ह्या वयात त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात. गेल्या काही दिवसापासून मी नेट वर शोधातच होतो कि ह्या हृदयविकारापासून वाचण्यासाठी काय करायचे त्याच वेळेला फॉरवर्डेड ईमेल मध्ये डॉ देवी शेट्टी ह्याच्याबरोबर झालेल्या मुलाखतीचा गोषवारा आला. डॉ देवी शेट्टी हे नारायण हॉस्पिटल बंगलोर मधील मुख्य हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांच्याबद्दलची जास्त माहिती ह्या लिंकवर दिलेली आहे. 

त्यांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचे भाषांतर येथे देत आहे. सर्वात शेवटी मूळ इंग्लिश चर्चा हि जोडत आहे.

प्रश्न: हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचण्याचे काही मुलभूत नियम आहेत काय?
उत्तर: 
1. आहार - कार्बोहाइड्रेट कमी , प्रोटीन अधिक, आणि तेलकट पदार्थ कमी  
२.  व्यायाम - एक ते अर्धा तास दररोज चालणे, कमीत कमी आठवड्यामधून पाच दिवस तरी  चालावे.लिफ्ट चा वापर टाळावा. जास्त वेळ एकाच जागेवर बसने टाळावे. 
3. धूम्रपान सोडावे. 
4. शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवावे.
5. रक्तदाब वर नियंत्रण आणि शुगर कमी करावी.

प्रश्न: मांसाहारी (मासे) खाने हृदयासाठी चांगले आहे का ? 
 उत्तर: नाही.

प्रश्न: कधी कधी शरीराने सशक्त किंवा उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीला सुद्धा हृदयझटका येण्याचे उदाहरणे दिसतात. झटका येण्याचे काही कारण असते का?
उत्तर: ह्याला मूक आक्रमण म्हणतात, ह्यासाठीच आम्ही ३० वर्ष वरील सर्व व्यक्तींना नियमित आरोग्य तपासणी करण्याची सिफारिश करतो.

प्रश्न:  हृदय रोग वंशपरंपरागत असतो का ? 
उत्तर: होय.

प्रश्न: हृदयावर जोर, तणाव (stress) पडण्याचे कारण काय असू शकतात ? हा तणाव कसा मिटवू शकतो?
उत्तर: जीवनच्या प्रति आपला दृष्टिकोण बदला. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता (perfection) आणण्याचा प्रयत्न करू नका.

प्रश्न: जॉगिंग आणि चालणे ह्यात चांगले काय आहे? किंवा त्याहून चांगला व्यायाम आहे का? 
उत्तर: जॉगिंग पेक्षा चालणे नेहमीच चांगले असते. जॉगिंग ने लवकर थकायला होते आणि सांधे दुखी वाढू शकते. 
 
प्रश्न: तुम्ही गरीब आणि जरुरतमंद लोकांसाठी खूप काही केले आहे तुम्हाला असे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 
उत्तर: मदर तेरेसा, जी माझी पेशंट होती.

प्रश्न: कमी रक्तदाब असलेल्या रोग्यांना हृदय झटका येऊ शकतो का ? 
उत्तर: अत्यंत दुर्लभ

प्रश्न: कोलेस्ट्रॉल कधी पासून जमा व्हायला सुरुवात होते? आता पासून चिंता करायची गरज आहे का ? का तीस वर्ष नंतरच त्याची काळजी घेतली पाहिजे ? 
उत्तर: कोलेस्ट्रॉल अगदी लहानपणापासून जमायला सुरुवात होते?

प्रश्न: अनियमित भोजन घेण्याच्या सवयीने हृदयावर कसा परिणाम होतो?
उत्तर: अनियमित भोजन घेण्यामुळे शरीराला अन्न विरघळणारे अन्न स्त्राव कधी निर्माण करायचे ते समजत नाही परिणामी अन्न चांगले पचत नाही.

प्रश्न: मी औषधे न घेता कोलेस्ट्रॉल सामग्री नियंत्रण कसा करू शकतो?
उत्तर: नियंत्रित आहार, चालण्याची सवय आणि अक्रोड खावे.

प्रश्न: योगसाधना  हृदय रोगापासून वाचवाण्याला मदत करते का ? 
उत्तर: योग नक्कीच मदत करतात.

प्रश्न: हृदयासाठी चांगले आणि वाईट आहार कुठला? 
उत्तर: फळे आणि भाज्या चांगला आहार आहे  आणि तेल सर्वात वाईट. 

प्रश्न: कुठले तेल चांगले असते?  शेंगदाण्याचे, सुर्यफुल, ओलीव तेल?  
उत्तर: सर्व तेल खराब असतात.

प्रश्न: कुठले रुटीन चेकअप केले पाहिजे ?काही विशेष परीक्षण आहेत का? 
उत्तर: नियमित रक्त दाब परीक्षण कोलेस्ट्रॉल, शुगर सुनिश्चित करण्यासाठी, ट्रेडमिल टेस्ट.

प्रश्न: हृद्य झटका आल्यावर कुठले प्राथमिक उपचार केले पाहिजे?
उत्तर: झटका आलेल्या माणसाला झोपण्याच्या स्थितीत पडण्यासाठी मदत करावी. एक एस्पिरिन गोळी जर उपलब्ध असेल किंवा एक सोर्बित्रेत (sorbitrate) गोली जीभेखाली ठेवायला मदत करावी. त्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था करावी. कारण अधिकतम नुकसान पहिल्या एक तासात होते. 

प्रश्न: गॅसेस मुळे छातीत दुखणे आणि हृदयविकाराने छातीत दुखणे हे दोन्ही मधला फरक कसा समजावा?
उत्तर: ईसीजी केल्याशिवाय सांगणे अत्यंत कठीण असते. 

प्रश्न: तरुण  मुले/मुली मध्ये हृदय विकाराची समस्या वाढण्याचे कारण काय? ३०-४० वयोगटातील लोकांमध्ये हि समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे?
उत्तर: वाढत्या जागरुकतेने अशा घटनामध्येहि वाढ होत आहे, ह्या शिवाय आजची  जीवन शैली, धूम्रपान, जंक फूड, व्यायामाची कमतरता अशा कारणामुळे युरोप आणि अमेरिका सारख्या देशांपेक्षा आपल्या इथे हृदयरोगाच्या जास्त घटना घडताहेत.

प्रश्न:एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा १२०/८० ह्या सामान्य श्रेणी पेक्षा जास्त असेलआणि तरी सुद्धा तो व्यक्ती शारीरिक रित्या स्वस्थ असू शकतो का?
उत्तर: होय नक्कीच

प्रश्न: जवळच्या नात्यात केलेल्या लग्नामुळे होणाऱ्या मुलांना ह्याचा त्रास होऊ शकतो. हे खरे आहे का?
उत्तर: होय.

प्रश्न:आमच्या पैकी खूप लोकांची जीवनशैली अनियमित आहे व ऑफिस मध्ये उशिरा पर्यंत थांबणे हे आमच्या हृदयाला त्रासदायक होऊ शकते का? ह्यासाठी कुठली सावधानता बाळगायला सुचवाल ?
उत्तर: जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा निसर्ग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. पण जेव्हा तुम्ही वयस्कर होत जाल तेव्हा जैविक घड्याळाचे (Biological Clock) ध्यान ठेवा.

प्रश्न: उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले लोक टेन्शन कमी होण्यासाठी गोळ्या घेतात त्याचे लघु / दीर्घ परिणाम होऊ शकतात का?
उत्तर:कुठल्याही गोळ्यांना साईड एफेक्ट असू शकतात. पण आधुनिक गोळ्या ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून बनवल्या जातात.

प्रश्न:जास्त चहा/ कॉफी घेणे हृदयाला धोकादायक ठरू शकते का ?
उत्तर : नाही

प्रश्न : अस्थमा चा त्रास असलेले रोग्यांना ह्या आजाराची  जास्त भीती असते का?
उत्तर: नाही.

प्रश्न: तुम्ही जंक फूड कशाला म्हणाल?
उत्तर : तळलेले पदार्थ, मॅकडोनाल्ड,समोसे आणि अगदी मसाला डोसा सुद्धा.

प्रश्न: तुम्ही म्हटले कि अमेरिकन आणि युरोपिअन लोकांपेक्षा भारतीय लोकांन  तीन पटीने जास्त धोका असतो. ते लोक पण जास्त जंक फूड खातात.
उत्तर: प्रत्येक पिढी हि काही प्रकारच्या आजाराने आणि नशिबाने असुरक्षित असते. भारतात महागड्या रोगांची जोखम जास्त आहे.

प्रश्न: केळे खाल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते का ?
उत्तर : नाही.

प्रश्न: एखादा व्यक्ती हृदयचा झटका आला असता स्वत:ची मदत करू शकतो का ? कारण फोरवर्ड ईमेल मध्ये आम्ही असे नेहमी बघतो.
उत्तर: होय ! खाली आरामात आडवे झोपून घ्यावे आणि कुठलीही एस्पिरीन ची गोळी जिभेखाली धरावी. जवळ असणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगावे, अँब्युलंस ची वाट बघत बसू नये कारण शक्यतो अशा वेळेला त्या लवकर येत नाहीत.

प्रश्न: सफेद रक्त पेशी कमी असणे आणि हिमोग्लोबीन ची कमतरता हृदय रोगाला कारणीभूत ठरतात का ?
उत्तर: नाही, पण शरीरात योग्य मात्रात हिमोग्लोबीन असणे आवश्यक आहे.

प्रश्न: कधी कधी व्यस्त जीवनशैली असल्याने आम्ही व्यायाम करू शकत नाही पण अशा वेळेला जर आम्ही घरी चालत गेलो किंवा पायऱ्या चढलो तर ते फायदेमंद ठरेल का ?
उत्तर : नक्कीच. अर्ध्या तसा पेक्षा एका जागेवर बसने टाळा. एका खुर्ची वरून उठून दुसऱ्या खुर्ची वर बसने सुद्धा नक्कीच उपयोगी येते.  

प्रश्न: मधुमेह आणि हृदय रोग ह्यांचा संबंध आहे का ?
उत्तर: होय. मधुमेह रोग्यांना इतर माणसांपेक्षा झटका येण्याचे जास्त चान्सेस असतात.
प्रश्न: हृदयाचे ऑपरेशन केल्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे ?
उत्तर: योग्य आहार, व्यायाम, वेळेवर औषधे घेणे आणि कोलेस्ट्रॉल, रक्तदाब व वजन ह्यावर नियंत्रण ठेवणे.

प्रश्न: रात्रपाळी चे काम करणाऱ्यांना दिवसपाळी करणाऱ्यांपेक्षा जास्त धोका असतो का ?
उत्तर: नाही.

प्रश्न: रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आधुनिक औषधे कुठली आहेत?
उत्तर: अशी शेकडोनी औषधे आहेत. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी नक्कीच बरोबर औषधे देतील पण माझ्या मता प्रमाणे गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक रीतीने रक्तदाब नियंत्रित करा, त्यासाठी व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.

प्रश्न:  डीसप्रिन आणि अन्य डोकेदुखीच्या गोळ्या रक्तदाब वाढवतात का ?
उत्तर : नाही.

प्रश्न:स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयरोगाचे काय प्रमाण आहे.
उत्तर: निसर्ग स्त्रियांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत जपतो /वाचवतो.

प्रश्न: हृदय चांगले ठेवण्यासाठी काय करू शकतो?
उत्तर : योग्य आहार, जंक फूड टाळा,व्यायाम करा, धुम्रपान सोडा, जर तुमचे वय ३० पेक्षा जास्त झाले असेल तर मेडिकल चेकअप करून घ्या. सहा महिन्यातून एकदा तरी चेकअप करावा.

वर झालेल्या संवादाचे मूळ इंग्रजी ईमेल इथे देत आहे.

A chat with Dr.Devi Shetty, Narayana Hrudayalaya (Heart Specialist) Bangalore was arranged by WIPRO for its employees. The transcript of the chat is given below. Useful for everyone.

Qn: What are the thumb rules for a layman to take care of his heart?
Ans:
1. Diet - Less of carbohydrate, more of protein, less oil
2. Exercise - Half an hour's walk, at least five days a week;avoid lifts and avoid sitting for a longtime
3. Quit smoking
4. Control weight
5. Control blood pressure and sugar

Qn: Is eating non-veg food (fish) good for the heart?

Ans: No

Qn: It's still a grave shock to hear that some apparently healthy person
gets a cardiac arrest. How do we understand it in perspective?

Ans: This is called silent attack; that is why we recommend everyone past the age of 30 to undergo routine health checkups.

Qn: Are heart diseases hereditary?

Ans: Yes
 
Qn: What are the ways in which the heart is stressed?What practices do you suggest to de-stress? Ans: Change your attitude towards life. Do not look for perfection in everything in life.

Qn: Is walking better than jogging or is more intensive exercise required to keep a healthy heart?

Ans: Walking is better than jogging since jogging leads to early fatigue and injury to joints.

Qn: You have done so much for the poor and needy.What has inspired you to do so? Ans: Mother Theresa , who was my patient


Qn: Can people with low blood pressure suffer heart diseases?

Ans: Extremely rare

Qn: Does cholesterol accumulates right from an early age
(I'm currently only 22) or do you have to worry about it only after you are above 30 years of age?

Ans: Cholesterol accumulates from childhood.

Qn: How do irregular eating habits affect the heart ?

Ans: You tend to eat junk food when the habits are irregular and your body's enzyme release for digestion gets confused.

Qn: How can I control cholesterol content without using medicines?

Ans: Control diet, walk and eat walnut.

Qn: Can yoga prevent heart ailments?

Ans: Yoga helps.

Qn: Which is the best and worst food for the heart?

Ans: Fruits and vegetables are the best and the worst is oil.

Qn: Which oil is better - groundnut, sunflower, olive?

Ans: All oils are bad .

Qn: What is the routine checkup one should go through?
Is there any specific test?
Ans: Routine blood test to ensure sugar, cholesterol is ok. Check BP,Treadmill test after an echo.

Qn: What are the first aid steps to be taken on a heart attack?

Ans: Help the person into a sleeping position , place an aspirin tablet under the tongue with a sorbitrate tablet if available, and rush him to a coronary care unit since the maximum casualty takes place within the first hour.

Qn: How do you differentiate between pain caused by a heart attack and
that caused due to gastric trouble?

Ans: Extremely difficult without ECG.
 
Qn: What is the main cause of a steep increase in heart problems amongst youngsters? I see people of about 30-40 yrs of age having heart attacks and serious heart problems.
Ans: Increased awareness has increased incidents. Also, sedentary lifestyles, smoking, junk food, lack of exercise in a country where people are genetically three times more vulnerable for heart attacks than Europeans and Americans.

Qn: Is it possible for a person to have BP outside the normal range of 120/80 and yet be perfectly healthy? Ans: Yes.


Qn: Marriages within close relatives can lead to heart problems for the child. Is it true? Ans : Yes, co-sanguinity leads to congenital abnormalities and you may not have a software engineer as a child.


Qn: Many of us have an irregular daily routine and many a times we have to stay late nights in office. Does this affect our heart ?What precautions would you recommend? Ans : When you are young, nature protects you against all these irregularities. However, as you grow older, respect the biological clock.


Qn: Will taking anti-hypertensive drugs cause some other complications (short / long term)?

Ans:Yes, most drugs have some side effects. However, modern anti-hypertensive drugs are extremely safe.

Qn: Will consuming more coffee/tea lead to heart attacks?
Ans : No.

Qn: Are asthma patients more prone to heart disease?
Ans : No.
 
Qn: How would you define junk food?
Ans : Fried food like Kentucky , McDonalds , samosas and even masala dosas.
 
Qn: You mentioned that Indians are three times more vulnerable.What is the reason for this, as Europeans and Americans also eat a lot of junk food?
Ans: Every race is vulnerable to some disease and unfortunately,Indians are vulnerable for the most expensive disease.

Qn: Does consuming bananas help reduce hypertension?

Ans : No.

Qn: Can a person help himself during a heart attack(Because we see a lot of forwarded emails on this)?
Ans : Yes. Lie down comfortably and put an aspirin tablet of any description under the tongue and ask someone to take you to the nearest coronary care unit without any delay and do not wait for the ambulance since most of the time,the ambulance does not turn up.

Qn: Do, in any way, low white blood cells and low hemoglobin count lead to heart problems?

Ans : No. But it is ideal to have normal hemoglobin level to increase your exercise capacity.

Qn: Sometimes, due to the hectic schedule we are not able to exercise. So, does walking while doing daily chores at home or climbing the stairs in the house, work as a substitute for exercise?
Ans : Certainly. Avoid sitting continuously for more than half an hour and even the act of getting out of the chair and going to another chair and sitting helps a lot..

Qn: Is there a relation between heart problems and blood sugar?
Ans: Yes. A strong relationship since diabetics are more vulnerable to heart attacks than non-diabetics.

Qn: What are the things one needs to take care of after a heart operation?  
Ans : Diet, exercise, drugs on time , Control cholesterol, BP, weight..

Qn: Are people working on night shifts more vulnerable to heart disease
when compared to day shift workers?

Ans : No.

Qn: What are the modern anti-hypertensive drugs?
Ans : There are hundreds of drugs and your doctor will chose the right combination for your problem, but my suggestion is to avoid the drugs and go for natural ways of controlling blood pressure by walk, diet to reduce weight and changing attitudes towards lifestyles.

Qn: Does dispirin or similar headache pills increase the risk of heart attacks?
Ans : No.

Qn: Why is the rate of heart attacks more in men than in women?
Ans : Nature protects women till the age of 45.

Qn: How can one keep the heart in a good condition?
Ans : Eat a healthy diet, avoid junk food, exercise everyday, do not smok and, go for health checkup s if you are past the age of 30(once in six months recommended) ...

Read More